कांद्याच्या कमी दरावरून शेतकऱ्यांमध्ये जी काही नाराजी पसरली होती या पार्श्वभूमीवर नाफेडने महाराष्ट्रातून कांदा खरेदीसाठी नवीन दर निश्चित केले असून त्यानुसार या जिल्ह्यांमध्ये प्रतिक्विंटल 927.92रुपये ते 1180 रुपये भाव मिळतील.
परंतु नाफेडणे ही दर निश्चिती केली तरी शेतकऱ्यांमध्ये नाफेड आणि सरकार विरोधात नाराजी आहे. या नाराजीचे कारणही तेवढेच रास्त आहे. जर कांद्याचा एकूण प्रति किलो उत्पादन खर्चाचा(Production Cost)विचार केला तर तो 15 ते 18 रुपयेपर्यंत येतो. त्यामुळे शेतकऱ्याने दहा ते बारा रुपये किलोने कांदा का विकणार असा कांदा लागवड शेतकऱ्यांचा प्रश्न आहे.
कांद्याला किमान तीस रुपये प्रति किलोचा भाव द्यावा. पण तसे होताना दिसत नाही. महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी याबाबत सांगितले की शेतमालाला चांगला भाव मिळाला नाही तर कांद्याची शेतीकालांतराने उध्वस्त होईल व शेतकरी इतर पिकांकडे वळतील.एक दिवस असा येईल की सरकारला इतर देशांकडून वाढीव किमतीत कांदा खरेदी करावा लागेल. देशातील 40 टक्के कांद्याचे उत्पादन महाराष्ट्रात होते. आशियातील सर्वात मोठे कांदा मार्केट लासलगाव येथे आहे.
दिघोळे म्हणाले कीं नाफेडने नाशिक धुळे जिल्ह्यासाठी 1181, अहमदनगर व बीड जिल्ह्यासाठी 1014.67,उस्मानाबाद साठी 941.67, पुण्यासाठी 927.92 आणि औरंगाबाद हिंगोली जिल्ह्यासाठी 891.67रुपये प्रति क्विंटल दर निश्चित केला आहे. याचा अर्थ नाफेड त्याच दराने शेतकऱ्यांकडून उत्तम दर्जाचा कांदा खरेदी करेल.
या सगळ्या परिस्थितीचा शेतकऱ्यांवर होणारा परिणाम(Effect On Farmer)
सध्या महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी कांद्याच्या भावामुळे आर्थिक संकटात सापडले असूननाफेड सारख्या सहकारी संस्थेला उत्पादन खर्चापेक्षा कमी भावात कांदा खरेदी करायचा असेलतर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होणा
दुसरा विपरीत परिणाम म्हणजे नाफेड ने कमी भाव दिल्यासबाजारातील व्यापाऱ्यांनाशेतकऱ्यांना लुबाडण्याची आयती संधी मिळेल. कांदा कमी भावात मिळण्यासाठी शेतकऱ्यांवर दबाव टाकतील असे असले तरी महाराष्ट्रातील बऱ्याच बाजारपेठांमध्ये 100 ते 900 रुपयांपर्यंतच भाव मिळत आहे.(स्रोत-किसानराज)
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:जाणून घ्या,जनावरांच्या पोटात प्लॅस्टिक /लोखंड यासारख्या अखाद्य गोष्टी कुठून येतात?
Share your comments