राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत आला आहे.कारण आता कांद्याच्या दरात खुप जास्त घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.कांदा निर्यातबंदी होऊन दोन महिने उलटूनही अजूनही निर्यातबंदी उठवण्यात आली नसुन सरकारनं कांदाबंदीचा निर्णय घेतला आणि त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे पाहायला मिळत आहे.सद्या शेतकऱ्यांच्या कांद्याला प्रतिकिलो एक ते दोन रूपये भाव मिळत आहे.या निर्यातबंदीचा शेतकऱ्यांना फटका बसत असुनही केंद्र सरकार निर्यातबंदीचा निर्णय मागे घेत नाही त्यामुळे शेतकरी आता त्रस्त झाले आहे.
राज्यातील बाजारपेठेत आता कांद्याची आवक कमी झाली आहे ,तरीदेखील शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य भाव मिळत नाही.सद्यस्थितीत शेतकऱ्यांना त्यांच्या निम्मेही भाव मिळत नाही.तर आज दि १० फेब्रुवारीला सोलापूर आणि राहुरी मंडईतील शेतकऱ्यांना कांद्याला केवळ १ रुपये प्रतिकिलोचा किमान भाव मिळाला.तर मनमाडमध्ये प्रतिकिलो २ रुपये भाव होता.त्यामुळे शेतकरी प्रचंड संतापले आहेत.सरकारनं कांदाबंदीचा निर्णय घेतला आणि त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे पाहायला मिळत आहे.सद्या शेतकऱ्यांच्या कांद्याला प्रतिकिलो एक ते दोन रूपये भाव मिळत आहे.या निर्यातबंदीचा शेतकऱ्यांना फटका बसत असुनही केंद्र सरकार निर्यातबंदीचा निर्णय मागे घेत नाही त्यामुळे शेतकरी आता त्रस्त झाले आहे.
शेतकऱ्यांनी मोफत कांदा वाटावा सरकारची इच्छा
कांदाप्रश्नी बोलतांना महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे सांगतात की, निर्यातबंदीमुळे बहुतांश शेतकऱ्यांना १ रुपये ते ८ रुपये किलोपर्यंत भाव मिळत आहे. यानंतरही सरकार निर्यातबंदीचा निर्णय मागे घेत नाही. याचाच अर्थ शेतकऱ्यांना आता मोफत कांदा वाटावा, अशी सरकारची इच्छा आहे. काही कारणास्तव हे सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागे लागले आहे.असेही भरत दिघोळे म्हणत आहेत.त्यामुळे कांदा उत्पाहक शेतकरी त्रस्त झाले आहे.
कांद्याच्या भावात झालेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. कमी दरात कांदा विकल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैसेच येत नाहीत.दि १० फेब्रुवारी सोलापूरच्या बाजारात केवळ ३४२५० क्विंटल कांद्याची आवक झाली,तरीही येथील किमान भाव हा १०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. सोलापूर आणि राहुरी मंडईतील शेतकऱ्यांना कांद्याला केवळ १ रुपये प्रतिकिलोचा किमान भाव मिळाला.तर मनमाडमध्ये प्रतिकिलो २ रुपये भाव होता.त्यामुळे शेतकरी प्रचंड संतापले आहेतसद्या शेतकऱ्यांच्या कांद्याला प्रतिकिलो एक ते दोन रूपये भाव मिळत आहे.या निर्यातबंदीचा शेतकऱ्यांना फटका बसत असुनही केंद्र सरकार निर्यातबंदीचा निर्णय मागे घेत नाही त्यामुळे शेतकरी आता त्रस्त झाले आहे.
Share your comments