आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजार पेठ (The largest onion market in Asia) म्हणून जगात प्रसिद्ध असलेली नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Lasalgaon Agricultural Produce Market Committee) गेल्या दोन दिवसांपासून केंद्रीय संस्था नाफेड (Nafed) कडून कांद्याची खरेदी केली जात आहे. यामुळे कांद्याच्या दरात (Onion Price) दोनशे रुपयांपर्यंत वाढ झाली असल्याचा तज्ञांचा अंदाज आहे. मात्र असे असले तरी नाफेड मात्र 700 ते 900 रुपये प्रति क्विंटल या दराने कांद्याची (Onion Rate) खरेदी करत आहे.
कांद्याला मिळत असलेला हा दर अतिशय कवडीमोल आहे आणि यातून उत्पादन खर्च (Production costs) काढणे देखील अशक्य असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी नमूद करत आहेत. कांद्याला नाफेड कडून अपेक्षित असा दर मिळत नसल्याने महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना (Onion Growers Association) आता आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोले यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीला जर तुम्ही महत्त्व देत नसाल तर आम्ही नाफेडची कांदा खरेदी हाणून पाडू असा इशारा दिला आहे. भारत दिघोले यांनी कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव दिला जावा आणि मग नाफेडने खरेदी करावी असा पवित्रा हाती घेतला आहे.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असतात. कृषी क्षेत्रातील जाणकार लोक सांगतात की, कांद्याचा खरा दर हा लासलगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेत मिळत असलेल्या दरावरूनच ठरतो. यामुळे या कांदा बाजार पेठेचे महत्त्व विशेष अधोरेखित करण्यासारखे आहे.
सध्या मात्र या बाजारपेठेत कांद्याला अतिशय कवडीमोल दर मिळत आहे. उच्च प्रतीच्या कांद्याला 900 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी (Onion growers) बेजार झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेच्या मते, कांदा खरेदी बाबत जर केंद्र सरकार कुठलाच निर्णय घेऊ शकत नाही तर मग केंद्र सरकारची संस्था नाफेड कांदा खरेदी करू शकत नाही.
गेल्या दोन महिन्यांपासून कांदा उत्पादक शेतकर्यांना कवडीमोल दरात आपल्या कांद्याची विक्री करावी लागत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकर्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
एकीकडे उत्पादनासाठी आवश्यक शेती निविष्ठांची किंमत दिवसेंदिवस आकाशाला गवसणी घालत आहेत तर दुसरीकडे अधिक उत्पादन खर्च करून उत्पादित केलेला शेतमाल अतिशय कवडीमोल दरात विक्री होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याऐवजी शेतकरी कर्जबाजारी होत आहे. सध्या कांद्याला 700 ते 900 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे, मात्र याकडे मायबाप शासनाचे लक्ष नाही. यामुळे कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल असा दर दिला जावा अन्यथा नाफेडची खरेदी बंद पाडू असा इशारा यावेळी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोले यांनी दिला आहे. आता संघटनेच्या या मागणीकडे मायबाप शासन गांभीर्याने बघते का आणि भविष्यात खरंच कांद्याला मागणी प्रमाणे दर मिळतो का हे विशेष पाहण्यासारखे राहिल.
Share your comments