1. बातम्या

कांदा शेतीतून बक्कळ कमाईसाठी कांद्याची लागवड करण्यापूर्वी करा योजना

खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे लागवडीसाठी योग्य होत आली आहेत. पुढील महिन्याच्या सुरुवातीला अनेक शेतकरी कांदा लागवड करतील. परंतु लागवडीपूर्वी योग्य योजना करणं आवश्यक असतं. कांदा पीक हे व्यापारी पीक म्हणून ओळखलं जातं.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
कमी खर्चात करा कांदा पिकाची लागवड

कमी खर्चात करा कांदा पिकाची लागवड

खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे लागवडीसाठी योग्य होत आली आहेत. पुढील महिन्याच्या सुरुवातीला अनेक शेतकरी कांदा लागवड करतील. परंतु लागवडीपूर्वी योग्य योजना करणं आवश्यक असतं. कांदा पीक हे व्यापारी पीक म्हणून ओळखलं जातं.

भारतातील अनेक राज्यात कांदा पिकाची लागवडे केली जाते आणि अनेक शेतकरी बक्कळ पैसा देखील कमावत असतात. सध्या कांदा बाजारात बारा महिने उपलब्ध असतो. कांद्याची वाढती मागणीमुळे कांद्याचे दर कधी-कधी गगनाला भिडत असतात. यामुळे सरकारपुढे कांदा दर वाढीचं संकट उभे राहत असते.

मग सरकार ग्राहकांना कमी दरात कांदा मिळवून देण्यासाठी कांद्याची आयात करुन बाजारातील दर खाली आणत असते. तर जर दर कमी झाले नाही तर विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडत सरकारविरोधात मोर्चा उघडत असते. परंतु कांद्याचे दर खाली आणल्याने शेतकरी वर्ग नाराज होत असतो. यामुळे सरकार कोंडीत सापडत असते. कमी दरात कांदे विकल्या गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडत असतो, परिणामी त्याला कांदा शेती परवडत नाही. यामुळे आज आम्ही तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहोत ज्यातून कांदा शेतीतील उत्पादन खर्च कमी होईल. आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न अधिक होईल आणि पैसा अमाप हाती येईल.

हंगामानुसार कांदा वाणांची निवड करा

सर्वप्रथम, कांद्याची लागवड होण्यापूर्वी, कोणत्या प्रकारच्या कांद्याची पेरणी करावी हे ठरविले पाहिजे जेणेकरून त्यांना अधिक चांगले उत्पादन मिळेल. कांद्याची लागवड वर्षातून दोनदा होते, एक रब्बीमध्ये आणि दुसरे खरीप हंगामात. पण बर्‍याचदा शेतकरी दोन्ही हंगामात एकाच जातीची पेरणी करतात, यामुळे कधी-कधी त्यांना अधिक उत्पन्न मिळत नाही आणि उत्पादन खर्च अधिक येत असतो. यामुळे हंगामानुसार कांद्याचे वाण निवडले पाहिजे. रबी हंगामासाठी कांद्याची उत्तम प्रकार म्हणजे पुसा रेड, रतनारा अस्केव, अ‍ॅग्री फाउंड गुलाब, कल्याणपूर लाल फेरी, अर्का कीर्तिमान वाणांची लागवडी केली पाहिजे. तर खरीप हंगामासाठी अॅग्री फाउंड डार्क, रेड, एन-५३, एफ१, हायब्रीड सीड ऑनियन, ब्राउन स्पेनिश आणि एन २५७-१ वाण चांगले असतात.

 

रोपवाटिका कशा तयार करणार

कांदा शेतीसाठी 10 बाय 10 आकाराच्या गादी वाफे तयार करून द्या. यानंतर एक एकराच्या क्षेत्रावरी लागवडीसाठी 5 किलोग्रॅम बियाणे लागते. पेरणीपूर्वी बियाण्यावर बुरशीनाशकाचा उपचार केला पाहिजे. त्यानंतरच वाफ्यांवर पेरणी करावी.अशा प्रकारे रोपे 30 ते 35 दिवसात लावणीसाठी तयार असतात.जमीनीची उभी आडवी नांगरणी करून कुळवाचे पाळया देऊन ढेकळे फोडून जमिन भूसभुशित करावी. जमिनीत हेक्‍टरी 40 ते 50 टन शेणखत मिसळावे. कांद्यांची रोपे, गादी वाफे तयार करणा-या क्षेत्रााची खोल नांगरट करून कुळवाच्‍या दोन तीन पाळया देऊन जमिन भुसभुशित करावी. गादी वाफा 1 मी रूंद 3 मी लांब 15 सेमी उंच करावा. वाफयातील ढेकळे निवडून बाजूला काढावीत. वाफयाच्‍या रूंदीशी समांतर अशा 5 सेमी बोटाने रेषा पाडाव्‍यात. आणि यात बी ओळीत पातळ पेरावे व नंतर मातीने झाकून टाकावे. बी उगवून येईपर्यंत.

संतुलित पोषक वापरा

कांद्याच्या पिकासाठी भरपूर पोषकद्रव्ये आवश्यक असतात, कांदा पिकामध्ये खते व खतांचा वापर माती परीक्षेच्या आधारे केला पाहिजे. जमिनीत हेक्‍टरी 40 ते 50 टन शेणखत मिसळावे. यासह कांदा पिकास हेक्‍टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्‍फूरद व 50 किलो पालाश लागवडीच्‍या वेळी घ्‍यावे. त्‍यानंतर 1 महिन्‍याने 50 किलो नत्र प्रति हेक्‍टरी दयावे. कांदा पिकाला नियमित पाणी देणे महत्‍वाचे असते. खरीप हंगामात 10 ते 12 दिवसाच्‍या अंतराने तर उन्‍हाळी रब्‍बी हंगामात 6 ते 8 दिवसांनी जमिनीच्‍या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे.

 

पाणी व्यवस्थानाकडे द्या लक्ष

खरीप हंगामात कांदा लागवड केल्यानंतर रोपे लावल्यानंतर लगेच पाणी द्यावे, नाहीतर रोपं जळून जाण्याची शक्यता असते. आवश्यकतेनुसार सिंचन केलं पाहिजे. दीर्घकाळापर्यंत शेत कोरडे ठेवू नये.

English Summary: Onion Farming For a hefty income, plan before planting onions Published on: 24 July 2021, 03:24 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters