सध्या राज्यात सर्वत्र रब्बी हंगामातील कांद्याची लागवड शेवटच्या टप्प्यात आल्याचे समजत आहे. पुणे जिल्ह्यात देखील बऱ्याच अंशी रब्बी हंगामातील कांद्याची लागवड आपटलेली दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी कांदा पिकाची लागवडीला प्राधान्य दिले असल्याने जिल्ह्यातील कांदा लागवडीखालील क्षेत्र वाढणार असल्याचे सांगितले जातं आहे. पुणे जिल्ह्यात यावर्षी जवळपास बारा हजार हेक्टरवर विक्रमी कांदा लागवड होणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केल्याचे समोर येत आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरून यावर्षी मल्चिंग पेपरचा वापर करून मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केल्याचे चित्र समोर येत आहे. येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी गादीवाफ्यावर कांदा लागवड केली असून त्याला ठिबक सिंचन प्रणाली द्वारे पाण्याची सोय केली आहे. जुन्नर व ओतूर परिसरात मोठ्या प्रमाणात या पद्धतीने कांदा लागवड करण्यात आली आहे. या आधुनिक पद्धतीचा वापर करून जिल्ह्यात जवळपास दोन हजार हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड केल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. राज्यात जवळपास सर्वत्र विशेषतः पुणे जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असल्याने जिल्ह्यातील सर्वच धरणे नद्या तुडुंब भरले असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड केल्याचे दृश्य समोर येत आहे.
जुन्नर तालुका तर आधीपासूनच मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामात उन्हाळी कांद्याची लागवड करत आला आहे, आणि यावर्षी देखील तालुक्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांदा लागवड नजरेस पडत आहे. शेतकरी मित्रांनो दशके आपणास ठाऊकच आहे रब्बी हंगामात लावला जाणारा कांदा उन्हाळ्यात काढणीसाठी तयार होतो आणि हा उन्हाळी कांदा टिकायला चांगला असल्याने शेतकरी बांधव या कांद्याची मोठ्या प्रमाणात साठवणूक देखील करत असतात. तालुक्यातील अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे कांदा साठवणुकीसाठी मोठमोठाल्या कांदाचाळी अस्तित्वात असल्याने, जेव्हा उन्हाळी कांद्याला चांगला बाजारभाव प्राप्त होतो तेव्हा येथील शेतकरी त्या कांद्याची विक्री करत असतात परिणामी येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला नफा प्राप्त होत असतो. त्यामुळे तालुक्यात रब्बी हंगामात उन्हाळी कांद्याची लागवड दिवसेंदिवस वाढतच आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला जुन्नर तालुक्यात नेहमी प्रमाणे यावर्षी कांदा लागवडीला प्रारंभ करण्यात आला आणि जवळपास 12 हजार हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी कांद्याची लागवड केली गेली.
मात्र यावर्षी या 12 हजार हेक्टर क्षेत्रामधून जवळपास दोन हजार हेक्टर क्षेत्रावर मल्चिंग पेपरचा वापर करून कांदा लागवड करण्यात आली आहे. येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केलेला हा आधुनिक प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श सिद्ध होताना दिसत आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या या आधुनिक प्रयोगाला जर चांगले घवघवीत यश प्राप्त झाले तर तालुक्यात नव्हे नव्हे तर जिल्ह्यात मल्चिंग पेपरचा वापर करून कांदा लागवड वाढण्याची शक्यता देखील अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
Share your comments