गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीने साठवलेल्या कांद्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.तसेच खरिपामध्ये लावलेला कांदा देखील प्रचंड प्रमाणात खराब झाला आहे.तसेच लावलेली कांदा रोपांची अतिपावसामुळे आणि पूर पाण्यामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.
कांद्याचे आगार समजल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात आलेल्या पावसाने कांद्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान होऊन उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी नाशिक जिल्ह्यातील कांद्याची आवक फारच कमी होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तीच परिस्थिती चाळीत साठवलेल्या कांद्याचे आहे.चाळीत साठवलेल्या कांद्याची आर्द्रतेमुळे 70 टक्के पैकी 35 टक्के नुकसान होते. तसेच वजनामध्ये देखील 30 टक्के घट येते. या सगळ्या मधून फक्त तीस ते पस्तीस टक्के कांद्याची विक्री होते.पुरलेल्या पस्तीस टक्के मधून पुढच्या हंगामाची कशीबशी तयारी करावे लागते.
आणि शेतकऱ्यांना थोडा भाव मिळाला लागताच लगेच जोरदार चर्चा सुरू होते.जर कांदा लागवडीचा विचार केला तर लागवडीपासूनते विक्री पर्यंत येथे जवळपास 85 हजार रुपयांच्या आसपास खर्च येतो. एकरी अंदाजे उत्पादनाचा विचार केला तर ते 160 ते 170 किंटल होते. ते पण नैसर्गिक परिस्थितीची साथ राहिली तर यावरून क्विंटलला 496 रुपये खर्च येतो.
जर विचार केला जेव्हा कांदा भाव वाढीचा विचार केला जातो तेव्हा त्यामागील खर्चाचा जर विचार केला तर शेतकऱ्याच्या हातात काहीच राहत नाही.अतिवृष्टी सारखी परिस्थिती निर्माण झाली तर कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडतो.उगीच भाव वाढ झाली म्हणून ऊर बडवत बसण्यापेक्षाशेतकऱ्यांना सहकार्य करणे फार महत्त्वाचे आहे.
काही दिवसात येऊ शकते कांद्याच्या भावात तेजी
सध्या कांदा दर हळूहळू वाढत जाऊन 40 रुपये प्रतिकिलो झालेला आहे.या पार्श्वभूमीवर मागणी जास्त असल्यामुळे राज्यातून कांद्याच्या व सुरू झालेली आहे.नव्याने येत असणारा कांदा पावसामुळे ओला झाला आहे. तसेच त्याचा दर्जा देखील घसरलेला आहे त्यामुळे नवीन कांदा अडचणीत आहे. तसेच जुना कांदा संपत आलेला असल्यामुळे दर्जेदार कांद्यासाठी आता अधिक पैसे द्यावे लागणार आहेत. दर कांदा भावाचा विचार केला तर किरकोळ बाजारात पांढरा कांदा 50 ते 60 रुपये किलो,लाल कांदा 30 ते 40 रुपये प्रति किलोने विकला जात आहे. दुसऱ्या राज्यातील म्हणजेच तेलंगणाचा विचार केला तर तेलंगाना मध्ये आलेल्या मुसळधार पावसाने कांद्याची पिके खराब झाली आहेत. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात कांद्याच्या दरात तेजी येण्याची दाट शक्यता आहे.
Share your comments