बातमीची हेडिंग वाचून कदाचित तुम्ही हसला असाल किंवा याला खोटं समजत असाल. पण हे खरं आहे, एक रुपयांत तुम्ही खरचं लखपती होणार आहात. एक रुपयांचा सिक्का तुम्हाला थेट लखपत बनवणार आहे. परंतु यासाठी तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागेल. जर तुम्ही जुन्या वस्तू जपणून ठेवत असला तर तुमच्याकडे हा सिक्का नक्कीच मिळेल. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून वेबसाईटवर जुन्या वस्तू खरेदी करण्याचा आणि विकत घेण्याचा ट्रेंड चालू आहे.
जुन्या वस्तू आणि सिक्के विकून लोक लाखो रुपये कमवत आहेत. जुन्या गोष्टी ह्या दुर्मिळ होत असतात, त्यामुळे त्यांची किंमत वाढत असते. असेच एक रुपयांचे सिक्के आहेत, जे खूप अधिक किंमतीत विकल्या जातात. ई-कॉमर्स वेबसाइट अशीच एक संधी देत आहे. ही ऑफर स्वातंत्र्यपूर्व नाणी असलेल्या लोकांसाठी आहे. याचा अर्थ असा की ज्यांच्याकडे भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी नाणी आहेत, ही ऑफर त्यांच्यासाठी आहे. ई-कॉमर्स साइट Quickr वर, महाराणी व्हिक्टोरियाच्या 1862 सालच्या नाणी 1.5 लाख रुपयांना विकल्या जात आहेत. जर तुमच्याकडे अशी नाणी असतील तर तुम्ही ती ऑनलाईन Quickr वर, विकू शकतात.
स्वातंत्र्यानंतर भारतात अनेक प्रकारच्या नाण्यांची निर्मिती बंद झाली. यामुळे अशा नाण्यांच्या किमती लक्षणीय वाढल्या आहेत. काही दुर्मिळ नाण्यांबरोबरच, अनेक भारतीय धनत्रयोदशी, दिवाळी आणि अक्षय तृतीयेसारख्या शुभ प्रसंगी महाराणी व्हिक्टोरियाची नाणी खरेदी करणे पसंत करतात.19 ऑगस्ट 1757 रोजी भारतात पहिले एक रुपयाचे नाणे जारी करण्यात आले. ईस्ट इंडिया कंपनीने हे नाणे कोलकाताच्या टाकसालातूनच जारी केले. खरं तर, 1757 मध्ये प्लासीच्या युद्धात विजय मिळवल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीला भारतात नाणी बनवण्याचा अधिकार मिळाला.
Share your comments