राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी पीक नोंदणी करणे सोपे व्हावे यासाठी मोबाईल ऍप ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
या मोबाईल ॲपच्या माध्यमातून मागील आठ दिवसात पिकांची नोंदणी केले गेल्याचा हा आकडा हा तब्बल एक लाख वीस हजार एवढा आहे. या ई पीक पाहणी उपसभापती वापरा जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केला असून पुणे जिल्ह्यातही जवळ जवळ चार हजार शेतकऱ्यांनी त्यांची नोंदणी केली आहे, अशी माहिती ई फेरफार प्रकल्प समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली.
पिकांच्या नोंदी ठेवण्याचे कामे संबंधित तलाठी यांचे असते. तलाठी हे पिक पेरणी अहवाल याच्या नोंदी नमूद करतात. मात्र गेल्या अनेक वर्षापासून सातबारा उताऱ्यावर असलेल्या पिकांच्या नोंदी या जुन्याच होत्या त्या अद्ययावत होत नव्हत्या. या पार्श्वभूमीचा विचार करून भूमिअभिलेख विभागाने हे ॲप विकसित केले आहे. या ॲपद्वारे शेतकऱ्यांना स्वतःच्या मोबाईल मधून पिकाचा फोटो अपलोड करता येतो. तसेच तसेच या मोबाईल ॲप मध्ये अक्षांश व रेखांश याची नोंद होणार असल्याने शेताचे अचूक स्थानही समजणार आहे.
या ॲपवर पिकांची वर्गवारी करण्यात आली असून त्यामध्ये 18 वर्ग करण्यात आले आहेत. याद्वारे आता कडधान्य,तृणधान्य, पॉलिहाऊस मधील पिके, भाजीपाला, फळे, औषधी वनस्पती यांचा समावेश आहे. या ॲपद्वारे आता 580 पिकांच्या नोंद घेता येणार आहेत.
माहिती स्त्रोत – प्रभात
Share your comments