1. बातम्या

उद्घाटनापूर्वीच समृद्धी महामार्गाची कमान कोसळून दुर्घटना, १ ठार २ जखमी

मुंबई ते नागपूर मध्ये तयार करण्यात आलेल्या समृद्धी महामार्गाच्या उद्धाटनाआधीच मोठी दुर्घटना घडली आहे. व १ कामगार ठार झाला असून २ जखमी झाले आहेत.

One killed, two injured in Samrudhi Highway arch collapse before inauguration

One killed, two injured in Samrudhi Highway arch collapse before inauguration

मुंबई ते नागपूर मध्ये तयार करण्यात आलेल्या समृद्धी महामार्गाच्या उद्धाटनाआधीच मोठी दुर्घटना घडली आहे. समृद्धी महामार्गाला एकूण १०५ कमानी आहेत , त्यापैकी मोठी असलेली उन्नत वन्यजीव मार्गाची कमान कोसळून अपघात झाला आहे. १ कामगार ठार असून २ कामगार जखमी झाल्याची माहिती आहे. सादर घटना सोमवारी रात्री 3 वाजता घडली आहे.

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण 2 मे रोजी होणार होते त्यासाठी राज्य सरकाने तयारीही सुरू केली होती, उद्घाटनापूर्वीच समृद्धी महामार्गाची कमान कोसळून अपघात झाल्यामुळे समृद्धी महामार्गाचं लोकार्पण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रसिद्धीपत्रक काढून पुढे ढकलावं लागलं आहे. हा सोहळा किमान दीड ते दोन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. अपघातातील मृत मजूर बिहारचा आहे.

नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सेलुबाजार ते वर्धा जिल्ह्यापर्यंत समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याची पाहणी केली होती. या महामार्गावर वन्यप्राण्यांचा वावर असतो त्यामुळे येथे ओव्हरपास बांधण्यात आले आहेत. त्यापैकी एक सोळाव्या नंबरचा ओव्हरपासचा आर्च कोसळला.

समृद्धी महामार्गावर अनेक ठिकाणी वन्यजीव उन्नत मार्ग म्हणजे वाईल्ड लाईफ ओव्हरपास बनवण्यात आले आहे. मात्र एका ठिकाणी आर्च पद्धतीचा ओव्हरपास अपघातामुळे क्षतिग्रस्त झाला आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम ३०  एप्रिलपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र काही कारणास्तव ते 30 एप्रिलपर्यंत पूर्ण होऊ शकणार नाही. अशातच ही दुर्घटना घडल्यामुळे आता हा सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या
मध्य प्रदेश सरकारचा मोठा निर्णय! आता होणार नैसर्गिक शेती 
मालेगावच्या पठ्ठ्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग!! बिया नसलेल्या कलिंगडाची लागवड अन परदेशी पाहुण्यांची बांधावर हजेरी

English Summary: One killed, two injured in Samrudhi Highway arch collapse before inauguration Published on: 27 April 2022, 11:36 IST

Like this article?

Hey! I am शैलेश म्हातारदेव डमाळे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters