1. बातम्या

पाच वर्षात शंभर लाख हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली - केंद्रीय कृषी मंत्री

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, ग्रामीण विकास तसेच पंचायती राज मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सूक्ष्म सिंचन योजनेतून एक मोठं लक्ष निश्चित केले आहे.  केंद्र सरकार कमी पाण्याचा उपयोग करुन  पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी  मायक्रो इरिग्रेशनवर  भर देत असल्याचे तोमर यांनी सांगितले. सरकारद्वारे राबविण्यात येणारी  मायक्रो सूक्ष्म  सिंचन योजनेच्या अंतर्गत पाच वर्षासाठी एक धोरण ठरविण्यात आले आहे. या धोरणानुसार शंभर लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचा निर्धार केंद्रीय मंत्री कृषीमंत्री तोमर यांनी केला आहे, ते मायक्रो इरिग्रेशन विषयी आयोजित एका वेबनार मध्ये बोलत होते. 

यावेळी बोलताना तोमर म्हणाले की,  देशातील  साधरण ११ लाख शेतकरी  वर्ष २०१९-२० मध्ये ड्रिप   (ठिंबक आणि तुषार सिंचन )आणि स्प्रिंकलर पद्धधतीचा लाभ घेत आहेत.  मायक्रो इरिग्रेशन फंड कॉर्पसच्या स्टियरिंग कमेटी आणि नाबार्डने राज्यांना ३ हजार ८०५ .६७ कोटी रुपयांच्या कर्जाची योजना आखण्यात आली आहे.  मंजूर करण्यात आलेल्या कर्जातून  १२.५३ लाख हेक्टर क्षेत्रात सिंचनाखाली आणण्यात येणार आहे.  दरम्यान या योजनाच्या अंतर्गत शंभर  लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणले जाईल.

यासाठी संबंधित विभागातील मंत्रालयाने, राज्यातील संस्था, सूक्ष्म सिंचन प्रणाली पुरवठादार सारख्या इतर भागधारकांचे समन्वित आणि एकत्रित प्रयत्न केवळ या प्रयत्नांद्वारेच पूर्ण केले जाऊ शकतात. या सर्वांच्या प्रयत्नांमुळे शेतकरी समुदायासाठी सूक्ष्म सिंचनाचे व्याप्ती वाढविण्यात येईल. केंद्रीय कृषिमंत्री म्हणाले की, शेतकर्‍यांच्या पिकांना पाणी देणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकर्‍यांना पाण्याचे महत्त्व समजले आहे आणि ते त्या वापराबद्दल खूपच सोयीस्कर आहेत. शेतकरी आपल्या विवेकबुद्धीनुसार पिकांमध्ये पाणी वापरतात. पिकांच्या लागवडीसाठी होणारा खर्च कमी झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना अधिक फायदा होत आहे. यासह शेतकऱ्यांच्या उत्पन्न आणि उत्पादन वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.

 

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters