खरीप हंगामापासून सुरू करण्यात आलेल्या ई पीक पाहणी चा लाखो शेतकऱ्यांना लाभ झाला. माझी शेती, माझा सातबारा अन माझं पिक या घोषवाक्य नुसार शेतकऱ्यांना आपल्या पिकांची नोंद करायचे आहे. या ई पीक पाहणी उपक्रमाची सुरुवात 15 ऑगस्ट 2021 पासून करण्यात आली होती.
खरीप हंगामामध्ये जवळजवळ 98 लाख शेतकऱ्यांनी या माध्यमातून पिकांची अचूक नोंद केली. रब्बी हंगामात देखील हीच पद्धत अवलंबण्यात येत आहे. रब्बी हंगामासाठी पिकाची नोंद करण्यासाठी 15 फेब्रुवारी ही अंतिम मुदत असल्याने शेतकऱ्यांकडे केवळ एक दिवस शिल्लक राहिला आहे. या लेखामध्ये आपण ई पीक पाहणी कशी करावी याबद्दल माहिती घेऊ.
अशा पद्धतीने करावी आपल्या शेतातील पिकाची इ पीक पाहणी
यासाठी शेतकऱ्यांना अगोदर आपल्या मोबाईल चे प्ले स्टोअर मधून ई पीक पाहणी ॲप डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर हे ॲप ओपन करून यामध्ये नवीन खातेदार नोंदणी करून घ्यायचे आहे. यामध्ये तुम्हाला तुमचे गाव जिल्हा आणि तालुका निवडायचा आहे. त्यानंतर खाते दारामध्ये पहिले नाव,मधले नाव, आडनाव आणि गट क्रमांक टाकायचा आहे गट क्रमांक टाकल्यानंतर शेतकऱ्याला आपले नाव समोर दिसते. त्यानंतर खाते क्रमांक तपासून आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे जो पुन्हा बदलता येणार नाही. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर चार अंकी पासवर्ड येईल तो कायम लक्षात ठेवावा लागणार आहे. कारण या ॲप मध्ये तोच पासवर्ड लागणार आहे त्यामुळे एस एम एस द्वारे पाठवला जाईल.
- यानंतर तुमची नोंदणी यशस्वी होणार आहे. यानंतर हे ॲप पूर्णपणे बंद करून पुन्हा चालू करायचे आहे. ॲप पुन्हा चालू केल्यानंतर पुन्हा तुम्हाला खातेदार म्हणजे तुमचे नाव निवडावे लागेल.संदेश द्वारे आलेला पासवर्ड येथे नमूद करायचा आहे. त्यानंतर पुढे जाऊन परिचय मध्ये खातेदाराचा फोटो अपलोड करायचा त्यानंतर दिलेली माहिती भरून सबमिट करायचे. त्यानंतर होममध्ये येऊन पिकाची माहिती नोंदवा असा एक फॉर्म येतो यामध्ये खाते क्रमांक नंतर गट क्रमांक, जमिनीचे क्षेत्र हेक्टर मध्ये भरायचे त्यानंतर हंगाम निवडायचा म्हणजे खरीप की संपूर्ण वर्ष ते निवडायचे, त्यानंतर पीक पेरणी साठी चे क्षेत्र किती याचा उल्लेख करायचा आहे.
- त्यानंतर पिकाचा वर्ग यामध्ये जे आपली पीक आहे त्याच निवडायचे यातील वेगवेगळ्या प्रकार ही असू शकतात त्यानंतर दिलेल्या पर्याय पैकी तुमचं कोणत पिकते निवडायचे आहे. पुन्हा त्या पिकाचे क्षेत्र भरायचे. त्यानंतर सिंचनाचे साधन काय आहेत याचा उल्लेख करायचा. त्यानंतर ठिबक पद्धती कशी आहे याची दिलेल्या पर्यायातून निवड करायची. त्यानंतर पीक लागवडीचे तारीख याची नोंद करायची. त्यानंतर कॅमेरा चा पर्यायातून फोटो काढायचा आणि तो फॉर्म सबमिट करायचा आहे.
- सबमिट झाल्यानंतर पुन्हा होम वर यायचं ही नोंदवलेली माहिती केवळ तुमच्या मोबाईल मध्ये सेव झाली. ती बघायची असेल तर पुन्हा पिकाची माहिती नोंदवा ह्याच्या वर क्लिक करायचे आहे. यामध्येही पिकाची माहिती यावर क्लिक करायचे. यामध्ये तुम्ही भरलेली माहिती दिसेल जी मोबाईल मध्ये सेव झालेले असेल. ही माहिती संबंधित सर्वरला पाठवण्यासाठी अपलोड या बटन आला क्लिक करायचे आहे. त्यानंतर आलेल्या दोन पर्यायांपैकी परिचय माहिती क्लिक करून माहिती अपलोड झालेले पाहायला मिळते. त्याचप्रमाणे पीक माहिती वरती क्लिक करुन अपलोड करायचे आहे. अशा प्रकारे इ पीक पाहणी या ॲपद्वारे आपल्याला पिकाची माहिती भरता येते.
Share your comments