अनेक दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यापासून गणपतीमध्ये पावसाने हजेरी लावली. आता आज गणपती बाप्पा आपल्या घरी निघून जाणार आहेत. आज हवामान विभागाने दक्षिण कोकणामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
तसेच मध्य महाराष्ट्रात, कोकणात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार तर उर्वरित राज्यांमध्ये तुरळकी ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
त्यामुळे याठिकाणी नागरिकांनी कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये, असे देखील आवाहन करण्यात येत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
तसेच कोकणामधील ठाणे, रायगड मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या ठिकाणी हवामान विभागाने अलर्ट देखील जारी केला आहे. यामुळे शेतकरी सुखावला आहे.
शेतकऱ्यांनो कमी खर्चात मोठा नफा हवा असेल तर आजच मेंढीपालन सुरू करा, जाणून घ्या...
विदर्भासह उर्वरित कोकण, मध्यमहाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळकी ठिकाणी पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. यामुळे शेतीच्या कामांना गती मिळणार आहे.
स्वाभिमानीचे अनोखं आंदोलन, पार्टी घ्या पण कारवाई करा, कृषी कार्यालयात बकरा, कोंबडी आणि दारु...
Share your comments