1. बातम्या

सातबारा उतारा: आता सातबारा उतार्यायवर जमीनमालकाच्या नावासोबत येणार आधार क्रमांक

आधार कार्ड सगळ्या महत्त्वाच्या कागदपत्रा पैकी एक महत्त्वाचे व अत्यावश्यक असे कागदपत्र आहे. आता प्रत्येकच गोष्टीसाठी आधार कार्डचे आवश्यकता भासते. तुम्हाला बँकेत खाते उघडायचे असो किंवा कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला आधार नंबर लागतोच लागतो.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
saatbaara

saatbaara

आधार कार्ड सगळ्या महत्त्वाच्या कागदपत्रा पैकी एक महत्त्वाचे व अत्यावश्यक असे कागदपत्र आहे. आता प्रत्येकच गोष्टीसाठी आधार कार्डचे आवश्यकता भासते. तुम्हाला बँकेत खाते उघडायचे असो किंवा कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला आधार नंबर लागतोच लागतो.

त्याचाच एक भाग म्हणून आता जमिनीच्या सातबारा उतार्‍यावर जमीन मालकाच्या नावाबरोबरच त्याचा आधार क्रमांक नोंदवण्यासाठी ची योजनेला आता पुन्हा गती आली असून त्यासाठी राष्ट्रीय सुचना केंद्राकडून संगणक प्रणाली विकसित करण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आली आहे. या आधार क्रमांकामुळे  नावाचा सातबारा उतारा द्वारे फसवणुकीपासून बचाव होणार आहे.

 याविषयीचे वृत्त सकाळ दैनिकाने दिले असून वृत्तानुसार, दस्त नोंदणी कार्यालयामध्ये बायोमेट्रिक सिस्टीम  अगोदर पासूनच होती.प्रणाली अस्तित्वात आल्यानंतर सातबारा उतारा जमीन मालकाचा आधार नंबर असल्यास दस्त नोंदणी च्यावेळी नोंदणी निरीक्षकांना मालकी हक्काची खात्री करून घेणे सोपे होणार आहे.

असे भूमिअभिलेख खात्यातील अधिकाऱ्यांनी सकाळशीबोलताना सांगितले. यासाठी महसूल कायद्यांमध्ये काही बदल करावे लागणार आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले.याआधी हवेली तालुक्यांमध्ये सातबारा उताऱ्यावर आधार क्रमांक नोंदवण्याचे काम प्रायोगिक तत्त्वावर हाती घेण्यात आले होते. आता ही प्रणाली तयार झाल्यानंतर एका तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर सातबारा उताऱ्यावर  आधार नोंदणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. 

यानंतर यामध्ये  कोणत्या प्रकारच्या अडचणी येतात अथवा नागरिकांच्या याबाबतच्या काही सूचना विचारात घेऊन त्यानुसार बदलही केले जाणार आहेत. याच दहा सातबारा उताऱ्यावर एकापेक्षा अनेक नावे असतात किंवा एका गावांमध्ये सारख्या प्रकारचे नावे असू शकतात त्यासाठी हा प्रयोग राबवताना खूप काळजी घ्यावी लागणार आहे.(संदर्भ-सकाळ)

English Summary: on saatbaara now landlord name and adhaar number both are printed Published on: 30 November 2021, 01:28 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters