आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा निघणार आहे. संयुक्त किसान मोर्चानं 26 जानेवारीला देशव्यापी आंदोलन करण्याची घोषणा केली असून 25 जानेवारीला महाराष्ट्रात देखील रस्त्यावर उतरत आंदोलने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात संयुक्त किसान मोर्चा पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे.
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट हमीभाव, देशव्यापी कर्जमुक्ती, जमीन अधिकार तसेच वीज विधेयक प्रश्नांसंदर्भात संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार आहे. २६ जानेवारी रोजी हरियाणातील जिंद येथे शेतकऱ्यांची भव्य महापंचायत घेऊन देशव्यापी लढ्याची सुरुवात होणार. ट्रॅक्टर रॅली, मोर्चे, निदर्शने आयोजित करून देशभरातील शेतकरी या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
राज्यातील शेतकरी खरीप हंगाम वाया गेल्याने संकटात सापडले आहेत. राज्यात यंदा शेतकऱ्यांनी 1 कोटी 41लाख हेक्टरवर खरीपाची पेरणी केली होती. गोगलगाईचा प्रादुर्भाव, वाणी आळीचा हल्ला, अति पाऊस या साऱ्यामुळं हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकरी हैराण झाले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीतून वाचलेल्या पिकांवर परतीच्या पावसानं मोठा आघात केला आहे.
मोठी बातमी! प्रत्येक महिन्याला 11000 रुपये मिळणार, LIC ने या प्लॅनमध्ये केला मोठा बदल
कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार पहिल्याच टप्प्यात राज्यातील 29 लाख हेक्टर पिके पावसाने मातीमोल केली आहेत. एकूण नुकसान पाहता राज्यभरात 40 लाख हेक्टर पिकांना परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. हे नुकसान पाहता राज्यात ओला दुष्काळ जाहीर करायला हवा होता, अशी भूमिका किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी मांडली.
Share your comments