सातारा: जिल्ह्यातील जावळी तालुक्याच्या एका शेतकरी (Farmer) कुटुंबातल्या विद्यार्थ्याने देखील यूपीएससी परीक्षा पास करून आयएएस (IAS) बनण्याचे स्वप्न बघितले. आज त्याने हे स्वप्न सत्यात उतरवून दाखवले आहे.
जावळी तालुक्यातील मौजे सनपाने येथील रहिवाशी ओंकार मधुकर पवार (Omkar Madhukar Pawar) या शेतकरी कुटुंबातील शेतकरी पुत्राने (IAS) भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षा परीक्षेत (UPSC Exam) यश संपादन करून आयएएस अधिकारी होण्याचा किताब पटकावला आहे.
ओंकार मधुकर पवार हा शेतकरी पुत्र आहे. विशेष म्हणजे ओंकार यांनी यूपीएससी परीक्षेत देशात 194 वी रँक मिळवली आहे. एवढेच नाही तर ओंकारने जावळी तालुक्यातील पहिला आयएएस अधिकारी होण्याचा बहुमान देखील मिळवला आहे. यामुळे ओंकारचे तालुक्यात सर्व स्तरावर तोंड भरुन कौतुक केले जात आहे.
भारतीय शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचे महत्त्व आणि फायदे
ओंकारच्या जिद्दीला सलाम
घरची आर्थिक परिस्थिती देखील त्यांची बेताची आहे. मात्र स्वभावाने जिद्दी व अगदी लहानपणापासून हुशार असलेल्या ओंकारने कठीण परिश्रम करत देशातील सर्वोच्च अधिकारी होण्याचा बहुमान पटकावला आहे. ओंकारचे वडील शेती करतात शिवाय संसाराचा गाडा हाकण्यासाठी शेती व्यवसायाला जोड म्हणून फोटोग्राफीचा व्यवसाय देखील ते करत आहेत.
त्यांच्या मातोश्री नीलिमा पवार या आपल्या पतीला शेतीव्यवसायात मदत करतात. ओंकारला एकूण दोन बहिणी आहेत. एक बहीण कला क्षेत्रात करिअर घडवीत आहे. तर त्यांची लहान बहीण त्याच्या मार्गदर्शनाखाली यूपीएससीचा अभ्यास करीत आहे.
ओंकार आता आयपीएस म्हणून हैदराबाद येथे रुजू आहे. मात्र आयएएस अधिकारीचं होणार दुसरं पद आपल्याला नको या भावनेने पेटून उठलेल्या ओंकारने अथक परिश्रमाला सुरवात केली. अन शेवटी त्याच्या कष्टाला यश आले अन आज ओंकारने आयएएस होण्याचे स्वप्न साकार केले.
अंबानी, बच्चन, तेंडुलकर आणि अक्षयकुमार हे पुणे जिल्ह्यातील 'या' डेअरीचे दूध पितात..!
Share your comments