निसर्गाचा अनियमितपणा असला तरी सुद्धा शेतकरी त्यामधून मार्ग काढत आपला तोल सांभाळत आहे. जरी यामधून पूर्णपणे यश मिळत नसले तरी सुद्धा तो प्रयत्न करणे सोडत नाही. दोन वर्षांपासून शेतकऱ्याने अनेक संकटांचा सामना केला आहे.अडीच महिने दिवसरात्र रक्ताचे पाणी करून तसेच योग्य प्रकारे नियोजन करून लाखो रुपयांचे टरबुजाचे उत्पन्न पदरी पडणार होतेच त्याच दरम्यान रात्रीच्या वेळी सुमारे ३ एकरातील २० टन टरबुजाची चोरी झाली आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे च नाही तर या चोरांच्या अजब प्रकारामुळे सुद्धा शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा प्रकार इंदापूर तालुक्यातील शेटफळ या गावातील पंकज शिंदे व स्वप्नील शिंदे या दोन्ही शेतकऱ्यांच्या शेतात घडला आहे. या लाखोंच्या नुकसाणीमुळे कसली दुष्मणता आहे हा प्रश्न सर्वांच्या समोर उपस्थित राहिला आहे.
वेगळा प्रयोग अन् अथक परिश्रम :-
पारंपरिक पद्धतीने शेतीमध्ये पिकांची लागवड करून जास्त उत्पन्न भेटत नसल्यामुळे शिंदे बंधूनी आपल्या ४ एकर शेतामध्ये टरबूज लावले. शिंदे बंधूनी लागवड करून चांगल्या प्रकारे शेतीची जोपासना सुद्धा केली. योग्य व्यवस्थापन केल्यामुळे माल ही चांगला होता जे की ३ एकर मध्ये ४० टन माल मिळेल असा अंदाज त्यांनी लावला होता. परंतु एकाच रात्रीत शिंदे बंधूंच्या अडीच ते तीन महिन्यांच्या कष्टावर पाणी फिरले आहे. एका रात्रीत ३ एकर बागेपैकी दीड एकर बागेतील टरबूज चोरी गेले आहेत. जवळपास २० टनाच्या आसपासचा माल चोरीला गेला असल्याने शिंदे बंधू अडचणीत आले आहेत.
गुन्हा दाखल तपास सुरु :-
पंकज शिंदे हे शेतकरी दररोजच्या प्रमाणे शेतात आले आणि त्यावेळी त्यांना हा नासधूस झालेला प्रकार समजला जे की ३ एकरामधील दीड एकरात टरबूज च न्हवते. पंकज यांनी हा सर्व प्रकार त्यांचे बंधू स्वप्नील यांना सांगितला जे की दोघांनी मिळून इंदापूर पोलीस स्टेशनला जाऊन अज्ञात फिरंगी लोकांबाबत तक्रार नोंदवली. जवळपास ४ लाख रुपयांचे शिंदव बंधू चे नुकसान झाले आहे. गुन्हा दाखल झाला असून पोलीस आता तपास करीत आहेत. सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे की चोरी झालेल्या टरबुजाचा कधी शोध लागतो आहे.
शिंदे बंधू सुद्धा तपास करत आहेत :-
पंकज शिंदे तसेच स्वनिल शिंदे यांनी ३ एकर मध्ये जे टरबूज लावले होते त्यामधील दीड एकर क्षेत्रावर असणारे टरबूज अचानकपणे गायब झाले असल्याने शिंदे बंधू सदम्यात गेले आहेत. मात्र शांत बसून काही होणार नसल्याने त्यांनी इंदापूर पोलीस स्टेशन ला तक्रार तर नोंदवली आहेच तसेच ते बाहेरून सुद्धा चाकाचोळ काढण्याचे काम करत आहेत. गावातील लोक असो किंवा शेजारी ज्यांचे शेत असो त्याच्याकडे जाऊन ते चौकशी करत आहेत.
Share your comments