सध्या मागील चार महिन्यापासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव फार जास्त प्रमाणात झाला आहे. सगळे आर्थिक चक्र हे थांबून गेले होते, परंतु या अर्थ चक्राला गती देण्यासाठी सरकारने अनलॉक करून नियोजनात्मक पद्धतीने आर्थिक चक्र गतिमान करण्याचा प्रयत्न केला. या अनलॉकमध्ये बँक पूर्णवेळ सुरू ठेवली जात आहे. त्यामुळे बँका पूर्णवेळ सुरू झाल्यामुळे अनेकजण बँकेचे कामे पूर्ण करत आहे. मात्र ऑगस्ट महिन्यात बँकांच्या कामांना ब्रेक लागणार आहे. पुढील महिन्यात तुमची बँकेची कामे उशिराने केली जातील. पुढील महिन्यात बँका बंद राहणार आहेत.
हो , याचे कारण आहे, ऑगस्ट महिन्यात नऊ दिवस बँका बंद असतील. येथे शनिवारपासून सुरू होत असलेल्या ऑगस्ट महिन्यात बँका किती दिवस बंद राहणार? कोणत्या दिवशी बँका बंद राहणार? याची माहिती नागरिकांना असणे फार महत्त्वाचे आहे, बँक कोणत्या दिवशी बंद राहतील हे नागरिकांना समजल्यास नागरिक बँकेशी संबंधित कामे तात्काळ पूर्ण करून घेतील. परिणामी खातेधारकांना होणारा मानसिक त्रास हा वाचेल
या दिवशी बंद राहतील बँका
1 ऑगस्ट -शनिवार बकरी ईद
2 ऑगस्ट -रविवार
8 ऑगस्ट -दुसरा शनिवार
9ऑगस्ट -रविवार
15 ऑगस्ट -स्वातंत्र्य दिन
16ऑगस्ट -रविवार
22ऑगस्ट -शनिवार गणेश चतुर्थी
23ऑगस्ट -रविवार
30ऑगस्ट -रविवार
तरी नागरिकांनी आपले महत्वाचे बँकेचे कामे या सुट्ट्यांच्या तारखा पाहून योग्य नियोजन करून आपली बँकेचे कामे करायची.
Share your comments