गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाशी झुंज देणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांना आता एका वेगळ्याच संकटाशी सामना करावा लागत असून यामुळे द्राक्ष बागायतदारांचे लाखोंचे नुकसान देखील झाले आहे. जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षाच्या बागा नजरेस पडतात याच तालुक्यातील काही द्राक्ष बागायतदारांना आता एका वेगळ्याच कारणामुळे संकटांचा सामना करावा लागत आहे यामुळे बागायतदारांची आर्थिक कोंडी झाली असल्याचे उघडकीस आले आहे.
त्याचं झालं असं, तालुक्यातील अनेक द्राक्षबागायतदार यांच्या बागांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढला होता. त्या अनुषंगाने तालुक्यातील कासेगाव आणि तळणी शिवारातील काही द्राक्ष बागायतदारांनी रोगराई वर नियंत्रण मिळवण्यासाठी क्लोरपारिफॉस घटक असलेल्या एका कीटकनाशकाची फवारणी केली.
हेही वाचा:-…. असं झालं तर कांद्याचे बाजारभाव पार करतील पाच हजरांचा टप्पा; जाणुन घ्या याविषयी
या कीटकनाशकांमुळे द्राक्ष बागांवर आलेले रोगराईचे सावट कमी होईल अशी बागायतदारांची आशा होती मात्र, रोगराई नियंत्रणात येण्याऐवजी यामुळे द्राक्षाच्या बागा जळू लागल्यात आणि द्राक्षाचे घड देखील सुकू लागल्याने गळून पडलेत.
यामुळे या शिवारातील द्राक्ष बागायतदार मेटाकुटीला आला असल्याचे चित्र बघायला मिळाले. द्राक्ष बागायतदारांनी या औषधाची तपासणी करण्याची मागणी केली त्या अनुषंगाने या औषधाची तपासणी केली असता त्यामध्ये कीटकनाशक घटक अतिशय अल्प प्रमाणात आढळले असून यामध्ये मोठ्या प्रमाणात तननाशक घटक असल्याचे उघडकीस आले. या तणनाशक घटकामुळे द्राक्ष बागा जळाल्या असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
हेही वाचा:-दुःखदायी! 'या' ठिकाणी हमालाकडून शेतकरी राजाला मारहाण; कारवाई करणार असं प्रशासनाचे आश्वासन
मध्यंतरी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे व अवकाळी सदृश्य परिस्थितीमुळे द्राक्ष बागांवर मोठ्या प्रमाणात रोगराई बघायला मिळाली. अंतिम टप्प्यात द्राक्षबागांवर रोगराई आली असल्याने उत्पादनात मोठी घट होणार असल्याचा बागायतदारांचा अंदाज होता, द्राक्ष बागांसाठी लाखो रुपयांचा खर्च केला असल्याने आता शेवटच्या टप्प्यात हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाऊ नये म्हणून तळणी आणि कासेगाव या शिवारातील द्राक्ष बागायतदारांनी क्लोरपारिफॉस घटक असलेल्या कीटकनाशकाची फवारणी केली. यामुळे रोगराई वर नियंत्रण तर मिळवता आले नाही उलट यामुळे द्राक्ष बागा जळाल्या. कीटकनाशक फवारणी केल्यामुळेच द्राक्ष बागा करपल्या असल्याचा शेतकऱ्यांनी दावा केला.
ज्या विक्रेत्याकडून औषधाची खरेदी केली होती तो विक्रेता या प्रकरणावर कुठलेच उत्तर देण्यास तयार नसल्यामुळे शेतकऱ्यांनी या औषधाची तपासणी प्रयोगशाळेत करण्याचे ठरवले. यासाठी द्राक्ष बागातील नमुने तसेच औषधाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. यावरून औषधांमध्ये तणनाशकाचे प्रमाण अधिक असल्याचे निष्पन्न झाली आणि म्हणूनच द्राक्षांच्या बागा जळाल्या. या औषधामुळे द्राक्ष बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे आणि द्राक्ष बागायतदारांनी कृषी विभागाकडे आता नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
Share your comments