शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा जवळचा सहकारी सध्या काळाच्या पडद्याआड गेला आहे. याबाबत शेट्टी यांनी स्वतः फेसबुक पोस्ट करत माहिती दिली आहे. ते म्हणाले, १९९२ -९३ मध्ये मी नुकतेच शेतकरी चळवळीमध्ये काम करण्यास सुरवात केली.
यावेळी शिरोळ तालुक्यात काही बोटावर मोजण्याएवढी लोक या चळवळीमध्ये माझ्यासोबत होती. कुरूंदवाड शहरात नरसू नाईक हे रांगडे व्यक्तीमत्व असलेले शेतकरी चळवळीमध्ये माझ्या खांद्याला खांदा लावून काम करू लागले. चळवळीच्या ऊमेदीच्या काळात सह्याद्रीच्या पहाडासारखे ते माझ्यासोबत काम करत राहिले.
२००२ च्या जिल्हा परिषद व २००४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी केलेले काम हे माझ्या राजकीय जीवनातील मैलाचा दगड आहे. २००९ च्या लोकसभेच्या निवडणुकी आधी त्यांनी मला एक गोष्ट बोलून दाखवली.
१० पोती कांदा विकून २ रुपयांचा चेक मिळाला, राजू शेट्टींनी समोर आणली धक्कादायक माहिती
मी ब-याचदा आमदारांच्या गाडीतून फिरलो, पण कांहीही करायच व एकदा मला खासदारांच्या गाडीतून फिरवायच आणि नरसू आण्णांची ही इच्छासुध्दा पुर्ण झाली. यामागे त्यांचे त्याग व कष्ट तितकेच कारणीभूत होते. आज वयाच्या ९० व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
Grape Rate : शेतकऱ्यांनो द्राक्षाचे पूर्ण पेमेंट मिळण्याबाबत खातरजमा करा, अनेकांची झालीय फसवणूक
गेल्या ३० वर्षाच्या चळवळीतील इतिहास डोळ्यासमोर आला. गेली ३० वर्षे जी चळवळ ऊभी राहिलेली आहे ती अशा त्यागी व निस्पृह व्यक्तींच्यामुळेच. अशा या नरसू नाईक यांना स्वाभिमानी परिवाराकडून भावपुर्ण श्रध्दांजली.
महत्वाच्या बातम्या;
7 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीचे 5 ट्रॅक्टर, शेतकऱ्यांनो जाणून...
किसान सभा 20 मार्च रोजी संसदेला घेरणार, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आक्रमक
काळ्यापाठोपाठ निळ्या गव्हाच्या शेतीमुळे शेतकरी श्रीमंत, आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने आहे खूपच मागणी
Share your comments