1. बातम्या

OBC Reservation : ओबीसी उपोषण २० दिवसांनी मागे; देवेंद्र फडणवीसांनी काय दिलं आश्वासन?

चंद्रपुरमध्ये मागील २० दिवसांपासून रवींद्र टोंगे, विजय बलकी आणि प्रेमानंद जोगी यांचे उपोषण सुरु होते. या तिघांनाही ज्सूस देऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं उपोषण सोडलं.

Obc reservation news

Obc reservation news

Chandrapur News : ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला उपोषण न देण्यासाठी मागील २० दिवसांपासून चंद्रपुरमध्ये ओबीसी महासंघाचे उपोषण सुरु होते. ओबीसींच्या आरक्षणाच्या मुद्द्यांवरुन हे उपोषण करण्यात आले होते. अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषण कर्त्यांना ज्यूस पाजला. त्यानंतर उपोषण कर्त्यांना आंदोलन मागे घेतले आहे. राज्य सरकारने ओबीसीच्या मागण्या मान्य केल्याबद्दल ओबीसी संघटनेने राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

चंद्रपुरमध्ये मागील २० दिवसांपासून रवींद्र टोंगे, विजय बलकी आणि प्रेमानंद जोगी यांचे उपोषण सुरु होते. या तिघांनाही ज्सूस देऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं उपोषण सोडलं. याप्रसंगी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि ओबीसी नेते बबनराव तायवाडे उपस्थित होते. यावेळी टोंगे यांनी आम्ही उपोषण आणि ओबीसींची सर्व आंदोलने मागे घेत असल्याचं जाहीर केलं.

काल शुक्रवारी सह्याद्रीवर ओबीसी नेत्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी शिंदे यांनी ओबीसींच्या सर्व मागण्या मान्य केल्या. तसेच ओबीसींच्या आरक्षणात कुणालाही वाटेकरी करणार नाही, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का देणार नाही, असं स्पष्ट केलं. त्यामुळेच टोंगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषण मागे घेतले. या बैठकीत ज्यांना बोलावण्यात आले नाही असे कोणाला वाटत असेल तर त्यांच्या सोबत देखील राज्य सरकार चर्चा करायला तयार आहे, असं यावेळी सांगण्यात आले.

दरम्यान, कुठल्याही समाजाचे आरक्षण कमी करण्याची शासनाची भूमिका नाही. मराठा समाजाचे रद्द झालेले आरक्षण पुन्हा मिळवून देताना इतर मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना कुणबी दाखले देण्यासंदर्भात निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची कार्यवाही सुरू आहे. राज्य शासन इतर मागास, भटक्या विमुक्त समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री यावेळी उपस्थितांना दिली.

English Summary: OBC fast called off after 20 days What did Devendra Fadnavis promise Published on: 30 September 2023, 11:00 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters