ओट हे एक रब्बी हंगामातील महत्त्वाचे चाऱ्याचे पीक आहे. हे एक प्रमुख तृनधान्य पीक आहे. देशातील अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करतात. त्यामुळे त्यांना शेतीसाठी शेणखतही मिळते. मात्र शेतकऱ्यांसमोर अनेक वेळा जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. तर काही वेळा हिरवा चारा नसल्यामुळे दूध उत्पादनात घट होते. त्यामुळे शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागतो.
पावसाळात शेतकऱ्यांकडे जनावरांसाठी भरपूर चारा असतो. पण जसजशी उन्हाळ्याची चाहूल लागते तसतसा शेतकऱ्यांकडील हिरवा चारा कमी होत जातो. त्यामुळे दूध उत्पादनावर याचा परिणाम होत असतो.जनावरांच्या चाऱ्याची टंचाई भासू नये यासाठी शेतकऱ्यांनी ओट चाऱ्याची लागवड करावी, जेणेकरून हिरवा चाऱ्याचा साठा करता येतो. ओट हे उत्तम चारा पीक असून जनावरांसाठी हा एक पौष्टिक चारा आहे. हे पीक लुसलुशीत, हिरवेगार व पौष्टिक असते. यामध्ये ८ ते ९ टक्के प्रथिने असतात.
जमीन - मध्यम ते भारी, चांगली निचरा होणारी जमीन या पिकास मानवते.
हवामान - या पीकाच्या लागवडीसाठी थंडे आणि कोरडे हवामान उपयुक्त असते. 15 ते 25 सेंटीग्रेड तापमान उत्तम असते.
पूर्वमशागत - एक नांगरणी करून जमीन भुसभुशीत करून घ्यावी. पूर्वमशागतीच्या वेळेस प्रतिहेक्टरी १०-१२ बैलगाड्या शेणखत जमिनीत मिसळावे.
पेरणी - ३० सेंमी अंतरावर पेरणी करावी आणि हेक्टरी १०० किलो बियाणे वापरावे.
सुधारित जाती - फुले हरिता, केंट, जे.एच.ओ.-८२२ या जातींचा वापर लागवडीसाठी करावा.
आंतरमशागत - एक खुरपणी ३० दिवसांनी करावी.
पाणी व्यवस्थापन - या पिकास १० ते १२ दिवसांनी पाणी देण्याची व्यवस्था करावी.
बिज प्रक्रिया - अॅझोटोबॅक्टर जिवाणू संवर्धन खत २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यास पेरणीपूर्वी चोळावे.
खते - १० ते १५ टन शेणखत १०० किलो नत्र ५० किलो स्फुरद : ५० किलो पालाश प्रति हेक्टर ३५० किलो नत्र ५० किलो स्फुरद व किलो पोटेंश पेरणीच्या वेळी ३५ किलो नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी ३० किलो नत्र पहिल्या कापणीनंतर प्रती हेक्टरी द्यावे.
पीक संरक्षण - मावा निंबोळी अर्क ५ मात्रा जास्त प्रमाणात असेल तर डायमेथोएट ०.०३ टक्के प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात फवारावे, औषध फवारल्यानंतर ७ दिवस जनावरांना हिरवा चारा घालू नये.
कापणी - पहिली कापणी ५५-६० दिवसांनी दुसरी कापणी ३०-४० दिवसांनी करावी.
उत्पादन - ४५०-५०० क्विटल प्रति हेक्टर येते.
Share your comments