1. बातम्या

Varas Nond: सातबाऱ्यावर ऑनलाईन नोंदवा वारस! वारस ऑनलाईन नोंदवण्यासाठी हे काम करा

Varas Nond :- जमिनीच्या संबंधित कुठल्याही प्रकारची कामे करायचे असतील किंवा सातबारा उतारा, फेरफार नोंदी तसेच वारस नोंदी इत्यादी कामाकरिता नागरिकांना तलाठी कार्यालयामध्ये जाण्याशिवाय पर्याय नव्हता. याकरिता बराच कालावधी लागायचा किंवा तलाठी कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागायचे. तरी देखील कामे वेळेवर होत नव्हते.परंतु आता या डिजिटल कालावधीमध्ये आणि तंत्रज्ञानाच्या युगात बऱ्याच क्षेत्रांमध्ये महत्त्वाची कामे आता ऑनलाईन पद्धतीने केली जातात.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
online process to vaaras nond

online process to vaaras nond

Varas Nond :- जमिनीच्या संबंधित कुठल्याही प्रकारची कामे करायचे असतील किंवा सातबारा उतारा, फेरफार नोंदी तसेच वारस नोंदी इत्यादी कामाकरिता नागरिकांना तलाठी कार्यालयामध्ये जाण्याशिवाय पर्याय नव्हता. याकरिता बराच कालावधी लागायचा किंवा तलाठी कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागायचे. तरी देखील कामे वेळेवर होत नव्हते.परंतु आता या डिजिटल कालावधीमध्ये आणि तंत्रज्ञानाच्या युगात बऱ्याच क्षेत्रांमध्ये महत्त्वाची कामे आता ऑनलाईन पद्धतीने केली जातात.

याच अनुषंगाने शासनाच्या महसूल आणि भूमी अभिलेख या दोन्ही विभागांनी देखील अनेक महत्त्वाची कामे जसे की वडिलोपार्जित जमीन, घर आणि वारस नोंद करायची असेल तर आता तलाठी कार्यालयात न जाता  नागरिकांना अशा कामांच्या नोंदी करिता ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. शासनाच्या भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली पासून एक ऑगस्टपासून ही सुविधा संपूर्ण राज्यात सुरू करण्यात आली आहे.

 वारस नोंद करा ऑनलाईन

 जर आपण यासंबंधीची माहिती घेतली तर भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून अगोदरच डिजिटल सातबारा उतारा तसेच ई फेरफार अशा प्रकारच्या सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा या दोन्हींमध्ये मोठ्या प्रमाणावर बचत झालेली आहे. याकरिता ई मोजणी व्हर्जन 2 उपलब्ध करून देण्यात आली असून यामध्ये आता ऑनलाइन पद्धतीने प्रकरण दाखल करता येणार आहेत व प्रॉपर्टी कार्ड सातबारा मध्ये आपोआप जोडले जाणार आहे.

यासाठीच्या आवश्यक वेरिफिकेशन देखील ऑनलाइनच केले जाणार आहे व ऑनलाईनच पेमेंट देखील करता येणार आहे त्यामुळे संबंधित कार्यालयांच्या खेटा मारण्याच्या उद्योग आता बंद होणार आहे.

 वारस नोंद ऑनलाईन कशी करावी?

 ऑनलाइन पद्धतीने वारस नोंद करण्याकरिता तुम्हाला महाभूमी अथवा त्याच्या संकेतस्थळावर जाऊन लॉगिन करावे लागणार असून त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. या संकेतस्थळावर जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर कराल तेव्हा तो तलाठ्याकडे जातो व तलाठी देखील त्याची तपासणी म्हणजेच व्हेरिफिकेशन ऑनलाईनच करतो. 

अर्जामध्ये काही कागदपत्रे अपूर्ण असतील तर त्याची माहिती अर्जदाराला ईमेलच्या माध्यमातून कळविण्यात येते. कागदपत्रे जर योग्य असतील व अर्ज परिपूर्ण योग्य असेल तर त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्यात येणार आहे. ही सुविधा संपूर्ण राज्यभर एक ऑगस्टपासून सुरू करण्यात आलेली आहे व वारस नोंदीसाठी आता या ऑनलाइन पद्धतीचा  वापर करणे गरजेचे आहे.

English Summary: now you can register vaaras nond by online process so read here important information Published on: 15 August 2023, 01:21 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters