मोबाईलच्या एका क्लिकने मोजा आपली शेत जमीन

09 April 2020 09:24 AM


बदलत्या काळात शेतीही आता आधुनिक होत असून बळीराजा शेत कामांसाठी आधुनिक यंत्रांचा वापर करत आहे. याच आधुनिकरणाच्या जोरावर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होत आहे. केंद्र सरकारच्या प्रयत्नातून शेतकऱ्यांसाठी कृषी बाजार आणि मंडईही शेतकऱ्यांच्या दारापुढे आल्या आहेत. सध्या बाजारात असेच एक ऐप आहे, याच्या माध्यमातून आपण आपली शेतजमीन मोजू शकतो.  शेती जमिनीच्या हद्दीवरुन नेहमी वाद होत असल्याचे आपण पाहत असतो.

यामुळे आपल्या बांधाशेजारील शेतकऱ्यांशी आपले सुत कधी जुळत नाही.  परंतु नवीन आलेल्या या (Mobile Application) ऐपमुळे आपण शेतजमीन मोजून आपला वाद मिटवू शकतो.  हा वाद मिटण्यासाठी आपल्याला आता न कागदाची गरज न पटवारीची गरज लागेल.  आज आपण हेच जाणुन घेऊ की, या मोबाईल ऐप च्या माध्यमातून शेत जमीन कसे मोजता येते.  आपल्या जवळ असलेल्या  स्मार्टफोनच्या मदतीने आपण शेत जमीन मोजू शकतो. शेत जमीन मोजण्यासाठी  आपल्याकडील स्मार्टफोनमध्ये इंटरनेट आणि जीपीएस असणे आवश्यक आहे.

प्लेस्टोरमध्ये जाऊन आपण जीपीएस एरिया कॅल्क्यलेटरचा सर्च करावा. या मोबाईल ऐपला (Mobile Application) इन्स्टॉल करुन डाऊनलोड करावे. आता याला ओपन करा सर्वात वरती असलेल्या नळ्या रंगामधील सर्च पर्यायात जा.  येथे आपल्याला जमीन मोजण्यासाठी दोन पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय हा वॉकिंगचा आहे.  तर दुसरा मॅन्यूअल मोजणीचा आहे. दोन्ही  पर्यायाने आपण  जमीन मोजू शकतो.

डिस्टेंस एंड एरिया - याच प्रमाणे अजून एक मोबाईल ऐप() प्लेस्टोरमध्ये उपलब्ध आहे.  ज्याचे नाव डिस्टेंस अँन्ड एरिया असे आहे.  या ऐपलाही आपण इन्स्टॉल करु शकतो.  इन्स्टॉल केल्यानंतर हे ऐप ओपन करावे.   त्यानंतर जीपीएसला सुरू करताना डिस्टेंस मीटर, फीट यार्डवर लक्ष द्यावे.  याच्या साहाय्याने तुम्ही जमीन मोजत असाल तर एक एकरच्या जमिनीचा आपण अंदाज पकडून स्टार्ट बटन दबावे. आपल्याला जितकी जमीन मोजायची आहे, तितक्या अंतरापर्यंत पायी चाला. आपली चक्कर पूर्ण होताच बरोबर हे ऐप  जमिनीचे माप सांगेल.

mobile application Field Measurement Application Land Measurement Application शेत जमीन मोजणी जमीन मोजणी
English Summary: now you can measure your field land by mobile application

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.