शेतकरी काबाडकष्ट करून शेतीत उत्पादन घेतात. परंतु त्यांनी पिकवलेल्या शेतमालाचे बाजारभाव नेमके किती चालू आहेत हे शेतकऱ्यांना अचूकपणे कळत नाहीत. त्यामुळे बऱ्याचदा शेतकरी बाजारपेठेत मालाची विक्री साठी नेतात व त्यामुळे बऱ्याचदा होते असे की कमीबाजार भाव असतो व त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते.
परंतु आता शेतकऱ्यांना याबाबतीत काळजी करण्याची गरज नाही वा कुठल्याही बाजारपेठेत बाजार भावा विषयी माहिती करून घेण्यासाठी जाण्याची गरज नाही.आता तुम्हीबाजारपेठेचे बाजार भाव अगदी तुमच्या मोबाईलवर पाहू शकता. या लेखात आपण देशभरातील शेतमालाचे बाजारभाव मोबाईलवर कसे पाहावे या बद्दल माहिती घेऊ.
अशा पद्धतीने मोबाईल वर पाहू शकता बाजार भाव
शेतकऱ्यांनी सगळ्यात अगोदर agmarknet.gov.in असे सर्च करावे. या संकेत स्थळावर सर्च केल्यानंतर एक नवीन वेबसाईट ओपन होते.
- या मध्ये डाव्या बाजूला तुम्हाला एक सर्च हा पर्याय दिसेल.त्यामध्ये तुम्हाला प्राईस हा एक कॉलम दिसतो.जशाचा तसा ठेवायचा आहे.त्यानंतर कमोडिटी या पर्यायावर क्लिक करूनतुम्हाला ज्या पिकांचा बाजार भाव पाहायचा आहे त्याचे नावनिवडायचे आहे.
- समजा तुम्हाला सोयाबीनचा भाव पाहायचा आहे तर त्यासाठी अगोदर स्टेट निवडायचे आहे.त्यानंतर समोर दिसणार्या मार्केट याकॉलम मध्ये तुमच्या जवळची बाजारपेठ सिलेक्ट करायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला कोणत्या तारखेपासून तर कोणत्या तारखेपर्यंत शेतमाल बाजारभाव पाहिजे आहेत ती तारीख टाकायचीआहे. नंतर गो या बटनावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होते. ज्यामध्ये तुम्ही तुम्ही निवडलेल्या मार्केटमधील पिकाचे बाजार भाव पाहू शकतात.
सरकारनेही संकेतस्थळ शेतकऱ्यांची सोय व्हावी म्हणून निर्माण केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक तर होणार नाही परंतु आपल्या शेतमालाची योग्य भाव काय आहे याची माहिती घेऊन त्याची विक्रीही करता येते.
Share your comments