
the wine
राज्यातील सुपर मार्केट आणि किराणा दुकानांमध्ये वाईन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
त्यामुळे राज्यातील अनेक किराणा दुकाना आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करता येऊ शकणार आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या उत्पादित केलेल्या फळांवर वायनरी उद्योग चालतो.शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चालना मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे नवाब मलिक म्हणाले.
किराणा दुकान आणि जीवनावश्यक वस्तू मिळण्याचे ठिकाणी म्हणजे सुपर मार्केट मध्ये सुद्धा वाइन विक्री केली जाणार आहे. परंतु त्यासाठी संबंधित किराणा दुकान हे एक हजार चौरस फुटांपेक्षा मोठे असले पाहिजे ही अट टाकण्यात आली आहे. दुकानांमध्ये एक शोकेस बनवून विक्री करता येणार आहे असे सरकारने अध्यादेशात म्हटले आहे राज्यात नवीवाईन पॉलिसी राबवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे आणि त्या दृष्टीने राज्य सरकारने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.
येणाऱ्या वर्षापर्यंत वाईन उद्योगाचा विस्तार एक हजार कोटी लिटर पर्यंत वाढवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. या दृष्टीने आता राज्य सरकारने पाऊल टाकायला सुरुवात केली आहे.
Share your comments