टोमॅटो सध्या मार्केटमध्ये नाव कमावत असून देशाच्या बऱ्याच भागांमध्ये टोमॅटो प्रतिकिलो शंभर रुपयांच्या पुढे गेला आहे. मागील काही दिवसांपूर्वी आपण पाहिले होते की, टोमॅटो अगदी बेभाव विकला जात होता.
शेतकऱ्यांना वाहतूक खर्च निघणे देखील मुश्कील झाले होते. परंतु त्याच शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या टोमॅटोला आता चांगले दिवस आले आहेत. तसं पाहायला गेलं तर या मागे बरीच कारणे देखील आहेत. पण मागच्या दोन आठवड्याचा विचार केला तर टोमॅटो 20 ते 30 रुपये दराने विकला जात होता.
परंतु आता राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये खासकरून दक्षिणेकडील राज्यांमध्ये शंभर रुपये प्रति किलोच्या वर टोमॅटो विकला जात आहे. जर यामध्ये काही कारणांचा विचार केला तर यामध्ये उत्तर प्रदेश राज्यातील बदायू सारख्या प्रमुख टोमॅटो पिकवणाऱ्या जिल्ह्यामध्ये दरवर्षीपेक्षा उष्णता जास्त झाल्याने टोमॅटो उत्पादनात घट आली. हीच परिस्थिती हरियाणा राज्यातही आहे.
तसेच महाराष्ट्राचा विचार केला तर कोल्हापूर आसपासच्या इतर भागात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने टोमॅटोची आणि इतर भाजीपाल्याची काढणी प्रभावित झाल्याने देशातील बाजारपेठेत टोमॅटोची आवक प्रचंड प्रमाणात घसरून भाववाढ झाली आहे.
काही राज्यातील परिस्थिती
उत्तर प्रदेश आणि हरियाणा मध्ये कडक उष्णतेमुळे भाजीपाला पिकांचे खूप नुकसान झाले व दक्षिण भारतात भाजीपाला पिके फारच कमकुवत आहेत.
यामध्ये टोमॅटो पिकाचा विचार केला तर टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात दक्षिण भारतातील चेन्नई आणि बेंगलोर सारख्या शहरांमध्ये जास्त होते. अशा ठिकाणी किमती शंभर रुपये प्रति किलोच्या वर गेले आहेत.
टोमॅटो भाव वाढीमागील मोठी कारणे
1- उत्तर प्रदेश व हरियाणा सारख्या मोठा टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये तीव्र उष्णतेमुळे पिकांचे नुकसान झाले त्यामुळे उत्पादनात घट आली.
2- महाराष्ट्रातील कोल्हापुरात मान्सूनपूर्व पावसामुळे टोमॅटोचे काढणी कमी झाली.
3- तसेच हरियाणातील लाडवा हा टोमॅटो उत्पादक परिसर असून याठिकाणी घोषणा त्याच्या तीव्र लाटेमुळे उत्पादनात घट आली.
4- सध्याचे ची टोमॅटोची आवक बाजारपेठांमध्ये होत आहे दक्षिणेकडील बाजारपेठेत होत आहेत. या ठिकाणी भाव दुप्पट आहेत.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:Ration Update: आता रेशनवर मिळणार कमी गहू, एक किलो गहू आणि मिळणार चार किलो तांदूळ
Share your comments