राज्यात ऊसदरावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यामुळे शेतकरी नेते आक्रमक झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आंदोलन करत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी मोर्चा देखील काढला होता. आता देखील त्यांनी इशारा दिला आहे.
आता ते म्हणाले, 25 नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी 'चक्का जाम आंदोलन' करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यामुळे आता तरी त्यांच्या मागण्या मान्य होणार का? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सध्या शेतकरी एकरकमी एफआरपीची मागणी करत आहेत.
राजू शेट्टी म्हणाले, सत्ताधारी भाजप-बाळासाहेबांची शिवसेना सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांकडे डोळेझाक करत आहे. शेतकऱ्यांना रास्त भाव मोबदला (FRP) एकरकमी देणे अनिवार्य करण्याच्या मागणीपासून मागे हटणार नाही.
शेतकऱ्यांनो देशी गाईच्या शेणापासून तयार करा पणत्या, लाखोंमध्ये होतेय कमाई, जाणून घ्या..
दरम्यान, एकरकमी एफआरपीसह अन्य मागण्यांसाठी पुण्यात साखर आयुक्तालयावर मोर्चा काढला, त्याची कोणतीही दखल सरकारने घेतली नाही. शेतकऱ्यांची पिळवणूक सुरूच आहे. यामुळे लढा देण्याची गरज आहे. ते म्हणाले, आता मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन करणार आहे.
एफआरपी काढण्याचे सूत्र निश्चित केले, तेव्हा इथेनॉल निर्मिती होत नव्हती. त्यामुळे आता नव्याने उसासाठी एफआरपी निश्चित करणारे सूत्र पुन्हा ठरवावे. यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे मिळणार आहेत. याबाबत सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा.
शेतकऱ्यांनो आता इनवेल बोअरिंग साठी मिळणार २० हजार रुपये
आम्ही सातत्याने मागणी करीत आहोत,पण सरकार ढिम्म आहे. काहीच निर्णय घेत नाही. सरकारने तत्काळ निर्णय घ्यावा, आम्हाला हिंसक आंदोलन करण्यास सरकारने भाग पाडू नये. असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या;
सौर प्रकल्पासाठी जमिनीला 75 हजार भाडे मिळणार, शेतकऱ्यांना दिलासा..
महावितरणकडून पुन्हा वीज तोडणी सुरू, 11 हजार कृषीपंपाचा वीजपुरवठा केला बंद
गेट्स फाउंडेशन आफ्रिकेत सुमारे 7 अब्ज गुंतवणूक करणार
Share your comments