1. बातम्या

कौतुकास्पद! आता शेतकऱ्यांच्या समस्या सुटणार, १५ वर्षीय मुलाने बनवलं एक खास अँप

शेतकऱ्यांच्या हितासाठी विद्यार्थ्याने एक अँप तयार केले आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतातून चांगले उत्पादन मिळवता या उद्देशाने तामिळनाडूतील एका १५ वर्षांच्या मुलाने एक अँप तयार केले आहे. या अँपचे नाव 'गोल्डन क्रॉप' असं आहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी विद्यार्थ्याने तयार केलं खास अँप

शेतकऱ्यांच्या हितासाठी विद्यार्थ्याने तयार केलं खास अँप

शेतकऱ्यांच्या हितासाठी विद्यार्थ्याने एक अँप तयार केले आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतातून चांगले उत्पादन मिळवता या उद्देशाने तामिळनाडूतील एका १५ वर्षांच्या मुलाने एक अँप तयार केले आहे. या अँपचे नाव 'गोल्डन क्रॉप' असं आहे. या अँपच्या मदतीने शेतकऱ्यांना जमिनीचा प्रकार आणि हवामानाच्या स्थितीनुसार पिकांची निवड करता येणार आहे.

१५ वर्षीय तरुणाने बनवले अँप

तामिळनाडूतील तिरुवन्नमलाई येथील अरविंद या १५ वर्षीय मुलाने या अँपची निर्मिती केली आहे. अरविंद हा व्हाईटहॅट ज्युनियरचा विद्यार्थी आहे. या अँपबद्दल माहिती देताना १५ वर्षीय अरविंद म्हणाला की, "शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनातील समस्या सोडवणारी कंपनी तयार करण्याचे माझे नेहमीच स्वप्न होते. मी माझ्या कंपनीचे नाव 'INBO' ठेवले आहे." "गोल्डन क्रॉप हा माझा छोटासा प्रयत्न आहे. या अँपमुळे आमचे शेतकरी त्यांच्या पिकातून चांगले उत्पन्न मिळवू शकतील आणि चांगले जीवन जगू शकतील", असे अरविंद म्हणाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
Tata's Electric Car: टाटाची ही गाडी चार्जिंगचे सगळे रेकॉर्ड मोडणार; जाणून घ्या कारचे फिचर आणि किंमत
आता मराठवाड्याचे टेन्शन मिटले; फळपिकाबाबात राज्य सरकारचा मोठा निर्णय

लवकरच हे अँप शेतकऱ्यांसाठी त्यांच्या स्थानिक प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे. अरविंद सध्या त्याचे 'गोल्डन क्रॉप' हे अँप देशभरातील शेतकऱ्यांसाठी कसे उपलब्ध करून देता येईल, यासाठी प्रयत्न करत आहे. त्याला संगणक क्षेत्रात करिअर करायचे आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
शेतकऱ्याचा नादच खुळा; घोड्यांना जुंपले औताला, मशागत झटक्यात उरकली
मोठी बातमी : बनावट शेतीमालाची विक्री केल्यास आता जेलची हवा खावी लागणार
एप्रिल महिन्यात 'या' भाज्यांची लागवड करून कमवा लाखोंचा नफा..!

शेतकऱ्यांना माती परीक्षण करण्यासाठी या अँपची मदत होणार आहे. थेट स्थानिक प्रयोगशाळांशी संपर्क साधता येणार आहे. या अँपच्या माध्यमातून शेतकरी आपल्या पिकाची तपासणी देखील करू शकतात. अरविंदकडून नियमितपणे हे अँप अपडेट केले जात असते. त्यामुळे शेतकऱ्यांना या अँपच्या सर्व सुविधा व्यवस्थित मिळतात. या अँपमधील इनबिल्ट फीचरद्वारे शेतकऱ्यांना शेतीविषयक तज्ज्ञांकडून अभिप्राय मिळतो. त्यामुळे हे अँप शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

English Summary: Now the problem of farmers will be solved, a 15 year old boy made a special amp Published on: 04 April 2022, 05:33 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters