राज्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्न सध्या चांगलाच पेटला आहे. सध्या गाळप हंगाम संपत आला असून अजूनही ज्यांचा ऊस तुटला नाही, त्यांची मोठी पळापळ सध्या सुरु आहे. यामुळे त्यांची झोप उडाली आहे. सध्या देशात महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक उसाचे गाळप करून रेकॉर्ड केला आहे. असे असले तरी अजून मोठ्या प्रमाणावर उसाचे गाळप राहिले आहे. यामुळे हे शेतकरी चिंतेत आहेत. आतापर्यंत लोकप्रतिनीधी, प्रशासन यांनी ऊसतोडणीचे आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे आता जिल्हानिहाय ऊस उत्पादकच बैठका घेऊन तोडगा काढत आहेत. यामुळे आता शेतकरीच आक्रमक झाले आहेत.
सध्या गाळप हंगाम संपत आला तरी 15 ते 20 टक्के ऊस हा अजूनही शेतातच आहे. आतापर्यंत गेटकेन ऊसाचे कारखान्यांनी गाळप केले मात्र, यापुढे आगोदर कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या ऊसाची तोड आणि नंतर इतर शेतकऱ्यांचा विचार अशीच भूमिका बीड येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. यामुळे आता शेतकरीच याबाबत पुढे होऊन आपला ऊस घालवण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. तसेच 10 मार्च ही डेडलाईन देण्यात आली आहे.
असे असताना यानंतरही गेटकेनच्या ऊसाला कारखान्यांनी प्राधान्य दिले तर मात्र जिल्ह्याच्या हद्दीवरच गाड्या अडिवणर असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे आता वातावरण तापले आहे. यावर्षी साखर कारखान्यांचे नियोजनच बिघडले आहे. लागण होऊन १५ महिने उलटले तरी ऊस हा फडातच आहे. वेळेत ऊसाचे गाळप न झाल्यामुळे वजनात घट येत आहे शिवाय उत्पादनही घटणार आहे. यामुळे याची शेतकऱ्यांना आर्थिक झळ बसणार आहे. सध्या अशी परिस्थिती आहे की आपले गाळप होणार की नाही, याची चिंता अनेकांना लागली आहे.
तसेच राजकीय हीतसंबंध जोपासण्यासाठी हद्दी बाहेरच्या ऊसाला प्राधान्य दिले जात आहे. लोकप्रतिनीधींसह प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा रखडत आहे. अनेक ठिकाणी आंदोलने केली जात आहे. मात्र प्रश्न कायम आहे. यामुळे सध्या जिल्हानिहाय ऊस उत्पादकांच्या बैठका पार पडत आहेत. रविवारी बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादकांची बैठक झाली. यामध्ये याविषयावर शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. यामध्ये 10 मार्चनंतर जर परजिल्ह्यातील ऊस गाळपासाठी आणला तर ऊसाची ट्रक जिल्हा हद्दीवरच अडवली जाणार असल्याचा इशारा शेतकरी नेते गंगाभिषण थावरे यांनी दिला आहे.
Share your comments