महागाई तसेच वाढते उत्पन्न जरी बळीराजाला मिळत असले तरी यामागील खर्च सुद्धा शेतकरी वर्गाचा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामध्ये अजून भर म्हणजे वातावरणातील बदल, निसर्गातील अनियमितता, खतांची टंचाई या सारख्या अनेक गोष्टी त्यासाठी पूरक आहेत. शेती हा फक्त एक कष्टाचा च विषय राहिलेला नाही तर योग्य गुंतवणूक आणि 'पिकेल ते विकेल'या धोरणाचा अवलंब करणे येणाऱ्या काळाची गरज झाली आहे. या गरजा भागवण्यासाठीच भारतीय केंद्र सरकारने शेतकरी बांधवांसाठी खास किसान क्रेडिट कार्ड ची योजना आमलात आणली आहे. असे केंद्र सरकारने विविध प्रसार माध्यमातून व्यक्त केले आहे.
शेती साठी लागणाऱ्या भांडवलाची योग्य वेळेत पूर्तता व्हावी म्हणून केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्ड ची योजना शेतकरी वर्गासाठी केली. बहुतांशी खेड्यामधील अनेक शेतकरी बांधवांना हे कार्ड कसे मिळवायचे याबाबद्दल कसलीच माहिती नाही आहे.
क्रेडिट कार्ड बनवण्याची प्रक्रिया:-
स्टेप 1:-किसान कार्ड शेतकरी वर्गासाठी खूप फायदेशीर आहे. त्याचे अनेक फायदे शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात होत आहेत. या साठी जर का किसान क्रेडिट कार्ड काढायचे असेल तर पहिल्यांदा किसान योजनेच्या अधिकृत pmkisan.gov.in वेबसाईटवर जावे आणि त्या वेबसाईट वरून किसान क्रेडिट कार्ड फॉर्म डाउनलोड कारावा लागणार आहे.
स्टेप 2:-वेबसाईटवरून फॉर्म डाउनलोड केल्यानंतर तो फॉर्म कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकारी यांच्या मदतीने योग्य आणि पूर्णपणे भरावा आणि जवळच्या बँकेत जाऊन जमा करावा. जमा।करताना या सोबत काही कागदपत्रे सुद्धा जोडावी लागतात. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला बँकेकडून किसान क्रेडिट कार्ड दिले जाते.
आवश्यक कागदपत्रे:-
फॉर्म बँकेत जमा करताना त्यासोबत वेगवेगळ्या कागडपत्रांची पूर्तता करणे गरजेचे असते. या मध्ये अर्जदाराचे पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, प्रतिज्ञापत्र, ज्यामध्ये आपण इतर कोणत्याही बँकेकडून कर्ज घेतलेले नाही असे नमूद केले असले पाहिजे.
क्रेडिट कार्डचे फायदे:-
जर का तुमचे किसान क्रेडिट कार्ड बनले तर शेतकरी बांधवांला 9 टक्के व्याजाने 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते त्याचबरोबर सरकारने व्याजावर सवलत देत 2 टक्के सबसिडी सुद्धा दिली आहे. जर का एखाद्या शेतकऱ्याने वेळेपूर्वी पूर्णपणे व्याज भरले तर त सरकार स्वतंत्रपणे 3 टक्के सबसिडी सुद्धा देते. म्हणजे शेतकऱ्यास एकूण फक्त 4 टक्के व्याज द्यावे लागणार आहे. जर का तुम्हालाकिसान क्रेडिट कार्डशी संबंधित काही समस्या किंवा अडचण असल्यास तुम्ही पोर्टलवर जाऊन तुमची तक्रार नोंदवू शकता. याशिवाय उमंग अॅपद्वारेही सुद्धा तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता.
Share your comments