यावर्षीचा उसाचा गाळप हंगाम हा मोठा कसोटीचा ठरला आहे. याचे कारण म्हणजे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर ऊस अजूनही शिल्लक आहे. आता मे महिना संपत आला तरी कारखाने सुरूच आहेत. यामुळे आता शेतकरी चिंतेत आहेत. काहींनी आता आपला ऊस जाणारच नाही, हे देखील मान्य केले आहे.
मराठावाड्यात तर परिस्थिती खूप वाईट आहे. प्रशासनाकडून एक ना अनेक प्रकारची नियमावली आणि पर्याय समोर आणले पण प्रत्यक्षात त्याचा कितपत फायदा झाला हे फडातील शिल्लक उसावरुन स्पष्ट होत आहे. अनेक ठिकाणी शेतकरी ऊस पेटवून देत आहेत. यामुळे सगळं चित्र समोर येत आहे. फक्त औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 80 हजार मेट्रीक टन ऊस गाळपाविना फडात उभा आहे.
तसेच अजूनही चार साखर कारखाने हे सुरु आहेत आणि दिवसाकाठी 6 हजार मेट्रीक टनाचे गाळप होत आहे. त्यामुळे अशा पध्दतीने संपूर्ण उसाचे गाळप होण्यासाठी किमान 2 महिन्याच्या कालावधी लागेल. आणि या कालावधी पर्यंत उसाचे वजन किती भरेल याचा अंदाज लावणे फक्त शेतकऱ्यांनाच जमेल. आणि तोपर्यंत कारखाने सुरू राहणार की नाही हा देखील एक मोठा प्रश्न आहे.
पाकिस्तानची उतरती कळा सुरू!! एकाच दिवशी पेट्रोलचे दर 30 रुपयांची वाढवले...
यामुळे आता मराठवाड्यात ऊस शिल्लक राहणारच हे जवळपास स्पष्ठ झाले आहे. यातच पावसाळा आता सुरू होणार आहे. दरवर्षी शेतकऱ्यांचा ऊस अधिक प्रमाणात गाळप व्हावा यासाठी कारखान्यांमध्ये स्पर्धा असते. यंदा मात्र चित्र बदलले आहे. नोंदणी असलेल्या ऊसाचे गाळप करुन आता अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम आहे.
उसाला 75 रुपये मिळणार? अतिरिक्त उसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
यंदा 7 महिने उलटले तरी सुरुच आहे. ऊस शिल्लक याचा अर्थ गाळप कमी असा नाही. कारण यंदा देशात सर्वाधिक गाळप हे महाराष्ट्रात झाले आहे. शिवाय साखर कारखान्यांनी क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप केले आहे. मात्र तरी देखील प्रश्न कायम आहे. यामुळे येणाऱ्या काळात ऊस लावताना शेतकरी नक्कीच विचार करेल.
महत्वाच्या बातम्या;
'या' भांड्यामध्ये ठेवा दूध, उन्हाळा असो किंवा पावसाळा तरी खराब नाही होणार
श्रीलंकेनंतर अजून एक देश आर्थिक संकटात, अन्नधान्यही संपले, भारताकडे मदतीची मागणी
यावर्षीही शेती परवडणार की नाही? बियाणांच्या दरात मोठी वाढ, सोयाबीन बॅग मागे 1 हजाराची वाढ
Share your comments