देशात मध्यप्रदेश राज्यानंतर सर्वात जास्त सोयाबीनचे उत्पादन महाराष्ट्रात घेतले जाते. राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न हे सोयाबीन, कापुस, आणि कांदा पिकावर अवलंबून आहे. यंदा सोयाबीनला सुरवातीच्या काळात विक्रमी भाव मिळत होता, सोयाबीनला दहा हजार क्विंटलच्या दराने बाजारभाव प्राप्त होत होता, पण हा भाव अचानक कमी झाला आणि त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलेत.
पण गेल्या काही दिवसात सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळायला सुरवात झाली, विदर्भातील अमरावतीमधील दरियापूर बाजार समितीत 26 नोव्हेंबरला सोयाबीन पिकाला साडे आठ हजार क्विंटलच्या दराने बाजारभाव प्राप्त झाला, जो की ह्या हंगामातील विक्रमी भाव म्हणुन नोंदला गेला. सोयाबीनला मिळणाऱ्या विक्रमी भावामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी पुन्हा आनंदी झाले होते, पण त्यांच्या ह्या आनंदाला कोरोनाच्या नव्या वॅरिएंटणे ग्रहण लावल्याचे चित्र दिसत आहेत.
ह्याच बाजार समितीत 26 नोव्हेंबरला मिळणाऱ्या विक्रमी भावात अवघ्या तीन दिवसात घसरण पाहायला मिळाली. 29 तारखेला दरियापूर बाजार समितीत साडे सात हजारावर येऊन ठेपला. म्हणजे अवघ्या तीन दिवसात सोयाबीनच्या भावात हजार रुपयापर्यंत पडझड झाली. व्यापाऱ्यांच्या मते, सोयाबीनला मागणी कोरोनाच्या नव्या वॅरिएंटमुळे लक्षणीय कमी झाली आहे. आणि साहजिक मागणी कमी असल्याने वाढलेले सोयाबीनचे दर पुन्हा कमी व्हायला सुरवात झाली. ह्या नवीन वॅरिएंटमुळे सोयाबीन निर्यात करायला अडचण येत असल्याचे व्यापाऱ्यांनी नमूद केले. ह्या बदललेल्या परिस्थितीमुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे.
सोयाबीनच्या किंमतीत 26 नोव्हेंबर पर्यंत वाढ होत होती, असे असले तरी आवक मात्र कमीच होती. सोमवारपासून सोयाबीनच्या किंमतीत कमालीची घसरण झाल्याचे दिसत आहे. अवघ्या दोन दिवसात अकराशे रुपयापर्यंत घसरण झाल्याचे सांगितलं जात आहे. ह्याचे प्रमुख कारण कोरोनाच्या नव्या वैरिएंटला सांगितले जात आहे, ह्या ओमीक्रोन मुळे निर्यात करायला अडचण येत असल्याचे सांगितलं जात आहे. कारण काहीही असले तरी पडते बाजारभाव सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक सिद्ध होत आहे.
सुरवातीला सोयाबीनला विक्रमी भाव होता पण 16 ऑगस्टला केंद्र सरकारने सोयामील आयात करायला परवानगी दिली आणि सोयाबीनचे भाव लक्षनीय कमी झालेत.
नवीन सोयाबीन बाजारात आल्यानंतर भावात अधिकच घसरण बघायला मिळाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन स्टोर करायला सुरवात केली, त्याचा फायदा झाला आणि किंमतीत सुधारणा झाली, म्हणुन आवकही वाढली. आणि अशातच ओमीक्रोन नामक कोरोनाचे नवे स्वरूप अनेक देशात पाय पसरवू लागले त्यामुळे निर्यातीत अडचण यायला सुरवात झाली आणि भाव परत कोसळायला सुरवात झाली. आता शेती विशेषज्ञ शेतकऱ्यांना सोयाबीन स्टोर करायचा सल्ला देत आहेत आणि परिस्थिती बघून सोयाबीन विक्री करावी असे सांगत आहेत.
Share your comments