1. बातम्या

आता झोपो आंदोलन!! महावितरण विरोधात आता शेतकरी आक्रमक

अनेकदा शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीज दिली जात नाही. यामुळे शेतकरी आक्रमक झाला आहे. आता सध्या राज्यात विजेची टंचाई भासत आहे. राज्यातील अनेक भागात भारनियमन सुरु झाले आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Farmers are now aggressive against MSEDCL

Farmers are now aggressive against MSEDCL

गेल्या काही दिवसांपासून राज्यात महावितरण विरोधात शेतकरी आक्रमक झाला आहे. अनेकदा शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीज दिली जात नाही. यामुळे शेतकरी आक्रमक झाला आहे. आता सध्या राज्यात विजेची टंचाई भासत आहे. राज्यातील अनेक भागात भारनियमन सुरु झाले आहे. यामुळे आता यामध्ये अजूनच भर पडली आहे.

ग्रामीण भागात रात्री बारा ते अडीच वाजेच्या दरम्यान भारनियमन करण्यात येत आहे. यामुळे औरंगाबादच्या बिडकीन येथील गावकऱ्यांनी महावितरण कार्यालयात झोपो आंदोलन केले. बिडकीन येथील गावकऱ्यांनी चक्क रात्र महावितरण कार्यालयात काढली. यामुळे सध्या याची चर्चा सुरु आहे. अनेक नागरिकांना याचा फटका बसत आहे.

दिवसभरात तुम्ही लोडशडींग करा, मात्र रात्रीचे अडीच तासाचे लोडशेडींग बंद करा. अन्यथा याचे परिणाम गंभीर होणार असल्याचा इशारा आंदोलक राजेंद्र चव्हाण यांनी दिला आहे. यामुळे आता महावितरण काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रात्रीचे लोडशेडींग बंद केले नाहीतर आज याठिकाणी सगळे पुरुष आले आहेत, उद्या याठिकाणी महिला येऊन आंदोलन करतील, असेही ते म्हणाले.

सध्या शेतकऱ्यांना देखील भारनियमनाचा मोठा फटका बसत आहे. सध्या विजेची मागणी वाढली आहे, तसेच सणासुदीचा काळ आणि तापमानात वाढ झाली आहे. यामुळे सुद्धा वीज संकट निर्माण झाले आहे. मागणी आणि पुरवठयामध्ये तफावत निर्माण झाली आहे. तसेच राज्यातील काही ठिकाणीच भारनियमन करण्याचा आमचा मानस असल्याचे राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले आहे.

यामुळे पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. यामुळे येणाऱ्या काळात यावरून मोठा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. यामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे विरोधक देखील आक्रमक झाले आहे.

महत्वाच्या बातम्या;
बैलगाडा शर्यतींचा थरार! नगर जिल्ह्यातील सगळ्यात मोठी बैलगाडा शर्यत राळेगण थेरपाळला भरणार
पशुपालकांसाठी ब्रेकिंग! 60 हजार गाईला तर 70 म्हशीला आता मिळणार अनुदान, पशुपालकांना होईल फायदा
भाऊ उन्हाळा चालू आहे! कलिंगड खायला आवडते का? जरूर खा पण जरा सांभाळून

English Summary: Now sleep movement !! Farmers are now aggressive against MSEDCL Published on: 22 April 2022, 10:56 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters