पतंजली गायीचे दुध व दुग्धजन्य पदार्थ बाजारात

Friday, 14 September 2018 10:32 AM


योगगुरु रामदेवबाबा यांच्या पतंजलीने गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गुरुवारी गायीचे दूध आणि दुग्धजन्य उत्पादने बाजारात आणली. पतंजली आयुर्वेदचे उत्पादन असलेल्या गायीच्या दुधाचा प्रति लिटर भाव 40 रुपये म्हणजेच बाजारभावापेक्षा दोन रूपयांनी कमी आहे. दिल्ली येथील तालकटोरा स्टेडिअममध्ये आयोजित एका कार्यक्रमात बाबा रामदेव यांनी स्वत: गायीचे दूध काढले. गायीच्या दुधासोबतच दही, ताक आणि पनीर या दुग्धजन्य पदार्थाांचीही पतंजलीकडून बाजारात विक्री केली जाणार आहे. हे पदार्थ टप्प्याटप्याने बाजारात आणले जातील.

पुढील देान वर्षांत दुग्ध उत्पादन क्षेत्रात सुमारे 1000 कोटी रुपयांचा महसूल उत्पन्न करण्याचे पतंजलीचे उद्दिष्ट आहे, असे रामदेव यांनी सांगितले. पतंजली कंपनीने दिल्ली एनसीआर, मुंबई, पुणे आणि राजस्थानात दुधाच्या वितरणासाठी 56 हजार किरकोळ विक्रेत्यांशी करार केला आहे. वर्ष 2019-2020 मध्ये प्रति दिन 10 लाख लीटर दूध वितरण करण्याची कंपनीला अपेक्षा आहे. पहिल्याच दिवशी चार लाख लीटर गायीच्या दूधाचे उत्पादन केल्याचे पतंजलीने म्हटले आहे. लवकरच पतंजलीचे फ्लेवर्ड मिल्कही (सुगंधी दुध) बाजारात येणार आहे. 

रामदेवबाबांनी पतंजली दुग्ध व्यवसायात उतरत आहे. ''पतंजलीच्या उत्पादनामध्ये गायीचे दूध, पनीर, बटरमिल्क, दही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या दुग्धजन्य पदार्थांसह पालेभाज्या मिळणार आहेत. पतंजलीचे दूध शंभर टक्के शुद्ध असेल. हे दूध विक्रीपूर्वी याची चाचणी करण्यात येणार आहे. या दुधाच्या चाचणीनंतरच हे दूध विक्रीसाठी जाणार आहे. गायीच्या दुधाची निर्मिती अधिक व्हावी आणि पुढील वर्षापर्यंत 10 लाख लिटर दुधाची निर्मिती व्हावी, हा त्यामागचा उद्देश आहे'', असे रामदेवबाबांनी सांगितले.

रामदेवबाबा पुढे म्हणाले, सुमारे 40 लाख लिटर गायीच्या दुधाची विक्री उद्यापासून बाजारात केली जाणार आहे. कंपनीकडून 2 हजार गावातून एक लाख शेतकऱ्यांकडून दूध उपलब्ध केले जाणार आहे तसेच पुढील वर्षापर्यंत दुगधजन्य पदार्थांच्या माध्यमातून देशातील सुमारे 5 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. 

patanjali milk ramdev baba रामदेव बाबा दुध पतंजली ayurveda आयुर्वेद
English Summary: now patanjali cow milk and milk products in market

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

Krishi Jagran and  Helo App Monsoon Update


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.