सातबारा उतारा हा शेतकऱ्यांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. बऱ्याचदा सातबारा उतारा मिळण्यासाठी तलाठी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात.
यातून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी नागरिकांना आता सातबारा सेतू कार्यालयातच मिळणार आहे. प्रजासत्ताक दिनापासून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व सेतू केंद्रात ऑनलाईन सातबारा,गाव नमुना 8 आणि ऑनलाइन फेरफार देण्याचे काम सुरू झाले आहे.
अशा पद्धतीने सेतू केंद्रातून ऑनलाईन सातबारा देणारा रत्नागिरी हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरला आहे.बऱ्याचदा महसूल विभागाकडे सातबाराव शेती संबंधी अन्य कागदपत्रे वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारीप्राप्त होतात. त्यासाठी सातबारा कियोस्क यंत्रणा असली तरी बऱ्याचदा नेटवर्क आणि अन्य तांत्रिक अडचणीमुळे या यंत्रणेला मर्यादा आहेत.
या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सातबारा सह जमिनीशी संबंधित अन्य कागदपत्रे ताबडतोब मिळावे यासाठी जिल्हाधिकारी डॉ.बी.एन. पाटील यांनी सर्व सेतू केंद्रात सातबारा,गाव नमुना 8 आणि फेरफार देण्याची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.त्याची प्रत्यक्ष सुरुवात प्रजासत्ताक दिनापासून करण्यात आली आहे.
Share your comments