सध्या रब्बी हंगामाची तयारी पूर्ण झाली असून रब्बी हंगामाच्या पेरण्या सुरू आहेत. परंतु या रब्बी हंगामाच्या तोंडावर युरियाचा तुटवडा भासत आहे. परंतु केंद्र सरकारच्या खत मंत्रालयाने 1.6 दशलक्ष टन युरिया आयात करण्याचा निर्णय घेतल्याने संपूर्ण रब्बी हंगामातयुरियाची कमतरता भासणार नाही.
तसेच कृषी सेवा केंद्रांकडून कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते.कृत्रिम टंचाई च्या नावाखाली सुरू असलेल्या लुटला देखील आता लगाम बसणार आहे.
सध्या रब्बी हंगामाची पेरणी ची तयारी सुरू असल्यानेदेशातील बऱ्याच राज्यातील शेतकरी खतांचा तुटवडा आहे म्हणून तक्रारी करत आहेत. आता मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने हिंदू बिजनेस लाईन ला सांगितले की, आयात केलेले एक दशलक्ष टन खत पश्चिम किनाऱ्यावरील बंदरांवर आणि सहा लाख टन पूर्व किनाऱ्यावर पोहोचेल. हे आयात केलेले सगळ्या प्रकारचे खास देशात पोहोचल्यावर देशांतर्गत बाजारपेठेत पुरवठा करण्यासाठी इंडियन पोटाश लिमिटेडला पुरवले जाईल.
भारतातील युरियाची परिस्थिती
भारत दरवर्षी अडीच दशलक्ष टन युरियाचे उत्पादन करतो. परंतु देशांतर्गत रुपयाची मागणी ही उत्पादनापेक्षा फारच जास्त आहे.जास्तीची मागणी भागवण्यासाठी दरवर्षी 80 ते 90 दशलक्ष टन युरियाची आयात करावे लागते.या बाबतीत सरकार मागणी आणि पुरवठा आणि किमतींचे मूल्यांकन करते व त्या दृष्टीने युरियाच्या आयातीला परवानगी देते. या वर्षी एप्रिल आणि जुलै या दरम्यान चीनने सुमारे दहा लाख टन युरियाची आयात केली. परंतु आता चीनने देशांतर्गत गरजा लक्षात घेऊन निर्यातीवर बंदी घातली आहे.
त्यामुळे भारताला आता रशिया आणि इजिप्तमधून युरिया आयात करावा लागणार आहे. चालू रब्बी हंगामामध्ये युरियाची मागणी सुमारे 17 लाख 9 हजार टन आहे. तर 24 नोव्हेंबर रोजी उपलब्धता पाच लाख 44 हजार टन होती.या हंगामात एक ऑक्टोबर पासून आतापर्यंत चार लाख 41 हजार युरियाची विक्री झाली आहे. अशा स्थितीत या हंगामासाठी केवळ 80 लाख टन युरिया शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.
Share your comments