MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

वाहनांसाठी आता पेट्रोल आणि डिझेलची गरज नाही, स्वस्तात मिळणार हे इंधन- गडकरींची योजना

मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे.त्यामुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. सामान्य जनतेची आर्थिक गणित कोलमडले आहे. यासाठी सरकारने कोणत्याही पर्यायाने पेट्रोल आणि डिझेलवरीलअवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
nitin gadkari

nitin gadkari

मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे.त्यामुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. सामान्य जनतेची आर्थिक गणित कोलमडले आहे. यासाठी सरकारने कोणत्याही पर्यायाने पेट्रोल आणि डिझेलवरीलअवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे

.केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी म्हटले आहे की,कार सर्व वाहन उत्पादकांना पुढे सहा ते आठ महिन्यात युरो सहा उत्सर्जन नियमानुसार फ्लेक्स इंधन इंजिन बनवण्याससांगेल.

नेमके काय आहे फ्लेक्स इंधन?

 हे इंधन पेट्रोल आणि मिथेनॉलकिंवा इथेनॉलच्या संयोगातून बनवलेले पर्यायी इंधन आहे.केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी सांगितले की, मी एक आदेश जारी करणार आहे त्यानुसार देशातील वाहनांमध्ये केवळ पेट्रोल इंजिन नव्हे तर फ्लेक्स फ्युएल इंजिन असेल.

. त्यामुळे लोकांना इंधन मधून 100% कच्च्या तेलाचा वापर करता येईल.सध्या ब्राझील,कॅनडा आणि अमेरिकेत फ्लेक्सफ्युएल इंजिन ची निर्मिती केली जाते. त्यामुळे वाहनचालकांना शंभर टक्के पेट्रोल किंवा  शंभर टक्के इथेनॉल वापरण्याचा पर्याय उपलब्ध होतो.

 केंद्र सरकारने येणाऱ्या दोन वर्षात पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल ब्लेडिंग चे लक्ष ठेवले आहे. जेणेकरून भारताला खनिज तेलाची आयात कमी प्रमाणात करावी लागेल.

जर 2015 चा विचार केला तर तेव्हा पेट्रोलमध्ये एक दीड टक्के इथेनॉलचीमात्रा होती सध्या हे प्रमाण साडेआठ टक्के आहे. पेट्रोल आणि इथेनॉलच्या मिश्रणामुळे इंधनाची गुणवत्ता सुधारते. तसेच उत्पादनासाठी कमी खर्च लागत असून प्रदूषणही कमी होते.

English Summary: now not necesary of petrol disel for vheicle now use flex fuel (1) Published on: 22 October 2021, 04:34 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters