MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

आता गायीच्या शेणापासून वीजनिर्मिती,ब्रिटनमधील शेतकऱ्यांनी शोधला वीज निर्माण करण्याचा पर्याय

शेती क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे संशोधन होत आहे. त्याला माहित आहे की गायीच्या शेनापासून रंगनिर्मिती देखील केले जात आहे. त्यामध्येच जरा वेगळ्या पद्धतीने गाईच्या शेणाचा उपयोग होत असल्याचे आता समोर आले आहे.ते म्हणजे आता गाईच्या शेणाचा वापर करून वीजनिर्मिती होणार आहे.या विषयावर ब्रिटनमध्ये संशोधन सुरू आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
cow dung

cow dung

शेती क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे संशोधन होत आहे. त्याला माहित आहे की गायीच्या शेनापासून रंगनिर्मिती देखील  केले जात आहे. त्यामध्येच  जरा वेगळ्या पद्धतीने गाईच्या शेणाचा उपयोग होत असल्याचे आता समोर आले आहे.ते म्हणजे आता गाईच्या शेणाचा वापर करून वीजनिर्मिती होणार आहे.या विषयावर ब्रिटनमध्ये संशोधन सुरू आहे.

 गाईच्या शेणापासून वीजनिर्मिती

आपल्याला माहिती आहे की गाईच्याशेणाचा उपयोग हा एकत्र करून आपण अंगण सारवण्यासाठी  जास्त प्रमाणात करतो तसेच इंधन म्हणून देखील गोवरयांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.परंतु यासंबंधात एक बातमी  पुढे आली आहे ती म्हणजे आता गाईच्या शेणापासून वीज निर्मिती केली जाणार आहे. ब्रिटनमधील शेतकऱ्यांनी गाईच्या शेणापासून वीज निर्माण करण्याचा पर्याय शोधला आहे. तेथील शेतकर्‍यांनी शेनापासून एक पावडर तयार केले आहे.पावडरचा वापर करून बॅटरी बनवण्यात येत असल्याचे शेतकर्‍यांचे एका गटाने सांगितले.

एक गाय देईल तीन घरांना वर्षभर विज

 ब्रिटनमध्ये शेतकऱ्यांनी केलेल्या प्रयोगांतीअसे दिसून आले की एक किलो शेणापासून एवढी वीज तयार झाली की,त्यावर व्हॅक्युम क्लिनर पाच तास चालवता येणे शक्य आहे. ब्रिटनमधील अर्ला डेरी ने शेनापासून  पावडर बनवून बॅटरी बनवली आहे. त्या बनवलेल्या बॅटरीला काऊ बॅटरी असे नाव दिले आहे. AA आकाराच्या पॅटरिच्या साह्याने साडेतीन तासापर्यंत कपडे इस्त्री करणे शक्य आहे . हा एक अतिशय उपयुक्त शोध असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे गाई पालन आला चालना मिळू शकते.

एका गायीच्या शेनापासून  तीन घरांना वर्षभर पुरेल एवढी वीज निर्माण होऊ शकते, असा दावा बॅटरी तज्ञ जीपी बॅटरी यांनी व्यक्त केला आहे.यामध्ये एक किलो शेण 3.75 किलो वॅट वीज निर्माण करू शकते. या हिशोबाने जर चार लाख 60 हजार गायींच्या शेणापासून वीज बनवली, तर तब्बल बारा लाख ब्रिटिश घरांना वीज पुरवठा करता येऊ शकतो.अरला या ब्रिटिश डेरी को-ऑपरेटिव द्वारे बॅटरी विकसित केली जात आहे.  की डेरी एका वर्षात दहा लाख टन शेणाचे उत्पादन करते.

( संदर्भ- हिंदुस्तान पोस्ट )

English Summary: now makeing electricity from cow dung experiment of britain farmer Published on: 21 November 2021, 07:33 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters