नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात येतो व नंतर मिळणाऱ्या नुकसानभरपाईची प्रक्रिया सुरू होते.
यामध्येही शेतकरी समस्या असतात की, नुकसान झालेल्या पिकांचा वेळेत पंचनामा होतो की नाही. त्यामुळे ई पीक पाहणी प्रमाणेच आता ईपंचनामा हा उपक्रम राबवला जाणार आहे.ई पंचनामा विषयी सविस्तर माहिती या लेखात घेऊ.
ईपंचनामा उपक्रम
आपल्याला माहिती आहेत की एकच तलाठी कडे अनेक गावांचा कारभार असत. त्यामुळे पीक पाहणी ही वेळेत होत नव्हते. त्याचा परिणाम हा शेतकऱ्यांना बऱ्याच वेळेस मदतीपासून वंचित राहण्यात होत होता. यावर शासनाने इ पीक पाहणी च्या माध्यमातून चांगला पर्याय उपलब्ध केला याच धर्तीवर आता ईपंचनामा हा उपक्रम राबविला जाणार आहे.
पिकांच्या पंचनाम्याची प्रक्रिया होणार सुरळीत
त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांच्या नोंदी या अचूकपणे केले आहे पडताळणी व मान्यता देण्याचे अधिकार आता तलाठ्याकडेचआहेत. ये पीक पाणी चा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता नोंद केलेले पीक जर नैसर्गिक आपत्तीमुळे वाया गेले असेल तर त्याचे पाहणी ही पंचनामा प्रणालीतून शेतकऱ्यांना देता येणे सहज शक्य होणार आहे.
कायआहे नेमकी प्रक्रिया?
या प्रक्रियेची सविस्तर माहिती दिलेली नाही. तरी ई पंचनामा प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी महसूल विभागाकडून स्वतंत्र ॲप तयार केले जाणार आहे. जे ईपिक पाहणीच्या आधारावर तयार केले जाणार आहे.
नुकसानग्रस्त पिकाचे फोटो काढून गट क्रमांक व अक्षांश - रेखांश याच्या नोंदी या स्वतः शेतकऱ्याला आपल्या मोबाईल मधून ऑनलाइन सादर करावी लागणार आहेत.तलाठ्यांना हीमाहिती तपासून अंतिम मान्यता देण्याचे अधिकार दिले जाऊ शकतात.
प्रक्रिया होईल अधिक सुलभ
इ पीक पाहणी या उपक्रमामुळे महसूल कर्मचाऱ्यांवरील ताण कमी झाला होता. आता ई पंचनामा हा उपक्रमही प्रत्यक्षात राबवण्यास सुरुवात झाली तर या कर्मचाऱ्यांचा तान अजून कमी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतः पंचनामा केला, त्याला तलाठ्यांनी मान्यता दिली आणि ही मान्यता शासनाने गृहीत धरून नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केले जाणार.
Share your comments