1. बातम्या

महत्त्वाचा मंत्रिमंडळ निर्णय! डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सौरऊर्जा कुंपण करण्यासाठी दिले जाणार अनुदान

अनेक वन्य प्राण्यांमुळे शेतीचे पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते.पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठा आर्थिक फटका बसतो.खूप प्रयत्न करून देखील वन्यप्राण्यांकडून होणारे नुकसान आटोक्यात आणता येत नाही.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक

अनेक वन्य प्राण्यांमुळे शेतीचे पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते.पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठा आर्थिक फटका बसतो.खूप प्रयत्न करून देखील वन्यप्राण्यांकडून होणारे नुकसान आटोक्यात आणता येत नाही.

म्हणून या पार्श्वभूमीवर वन्य प्राण्यांमुळे शेती पिकांचे होणारे नुकसान टाळावे यासाठी राज्यातील ज्या गावांमध्ये वन्य प्राण्यांपासून होणारे नुकसान जास्त आहे अशा संवेदनशील गावांमध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार असून त्या माध्यमातून सौर ऊर्जा कुंपण करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे होते.  आपण बऱ्याच दिवसापासून पाहत आहोत की, वन्य प्राण्यांचा मानवी वस्त्यांमध्ये वावर वाढत असल्याने  मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष पहायला मिळत आहे. यातच वन्यजीवमुळे शेतक-यांचे नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळेशेतकऱ्यांना रात्रीचे पिकांची राखण करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय तर होताच परंतु रात्रीच्या वेळी असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. त्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गतकंपनी उभारण्याची योजना राबवण्यात आली.

तेव्हा दिसून आले की या सौर ऊर्जाभागामध्ये वन्यप्राण्यांकडून पिकांचे होणारे नुकसान चे प्रमाण कमी झालेले आढळले. त्यामुळे या सर्व गोष्टींचा अभ्यास करून या योजनेची व्याप्ती वाढवून त्याअंतर्गत संवेदनशील गावांमध्ये शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपण उभारण्यासाठी अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली.

 या योजनेचे स्वरुप

 या योजनेत प्रति लाभार्थी सौर ऊर्जा कुंपणाच्या किमतीच्या 75 टक्के किंवा 15000 रुपये यापैकी कमी असेल त्या रकमेचे अनुदान देण्यात येईल. सौर ऊर्जा साहित्याच्या किमतीच्या अनुषंगाने उर्वरित 25 टक्के किंवा अधिकच्या रकमेचा वाटा लाभार्थ्यांचा राहील. यामध्ये ग्राम परिस्थितीकीय विकास समिती किंवा संयुक्त वन व्यवस्थापन समितीस शासनाकडून अनुदान उपलब्ध झाल्यानंतर लाभार्थी उर्वरित 25 टक्के यांचा वाटा समितीकडे जमा करेल.  संवेदनशील गावांची निवड तसेच सौर ऊर्जा कुंपण साहित्याचे मापदंड निर्धारित करणे व गुणवत्ता नियंत्रण हे प्रधान मुख्य वनसंरक्षक( वन्यजीव), नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली समिती करतील.

वर्ष 2022-23 मध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेतील शंभर कोटी पैकी 50 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद सौरऊर्जा कुंपनासाठी करता करण्यात येईल.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:शेतकऱ्याची यशोगाथा! या टेक्निकचा वापर करून अवघ्या दोन एकर संत्रा बागेतून मिळवले तब्बल दहा लाखांचे उत्पन्न

नक्की वाचा:महत्वाची बातमी! पीएम किसान योजनेअंतर्गत 6 हजार समवेतचं मिळणार 3 लाख रुपये; वाचा याविषयी

नक्की वाचा:मोलाचे मार्गदर्शन:आधुनिक तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांची प्राथमिकता हवी-श्री.डाॅ.अतुल.पु.कळसकर सर वरीष्ठशास्त्रज्ञ केव्हीके घातखेड अमरावती१

English Summary: now get to subsidy for solar energy fence to farmer goverment decision Published on: 29 April 2022, 08:31 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters