यावर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम हातचा गेला.कापूस आणि सोयाबीन या खरीप हंगामातील महत्त्वाच्या पिकांसोबत इतर पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जर सोयाबीन पिकाचा विचार केला तर सोयाबीनच्या बाजार भावात सातत्याने चढ-उतार अनुभवायला मिळाला.
या वर्षी जर बाजारपेठेचा अभ्यास केला तर सोयाबीनचे बाजार भाव हे शेतकऱ्यांच्या भूमिकेवर अवलंबून राहिले. शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा अभ्यास करूनच सोयाबीन टप्प्याटप्प्याने विक्रीसाठी आणले त्याचा फायदा देखील शेतकऱ्यांना मिळाला. तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी सुद्धा कापसाची साठवणूक करण्यावर जास्त भर दिला. यावर्षी कधी नव्हे एवढा कापसाला भाव मिळत आहे. परंतु अजूनही बाजारपेठेत हवा तेवढा कापसाची आवक होत नाहीये. चांगल्या प्रतीच्या कापसाला सध्या दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत भाव मिळत आहे.
परंतु अजूनही शेतकरी कापूस बाजारात विक्रीसाठी आणत नाहीयेत त्यामुळे आता कुठल्याही प्रकारची जोखीम न पत्करता आपला कापूस बाजारात विक्रीसाठी आणावा असे सल्लावजा आवाहनसीसीआयने केले आहे. सी सी आय चे मुख्य महाव्यवस्थापक एसके पाणिग्रही यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, सध्या रुई गाठींची प्रचंड मागणी ही राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात वाढली आहे. त्यामुळे कापसाच्या भावात कधी नव्हे एवढी त्याची आहे.मागणीच्या मानाने आवक कमी असल्याने कापसाचे बाजार भाव हे साडेदहा हजार पर्यंत गेले आहेत.परंतु त्यापेक्षा आणखी भाव वाढेल अशी शक्यता नाही.यापेक्षा जर अजून जास्तीचा भाव वाढला तरकापड मिल मालकांचे नुकसान होण्याची शक्यता जास्त असल्यानेत्यामुळे भाव वाढ होण्याची शक्यता कमी आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी अजूनही दरवाढीची प्रतीक्षा न करता आपला कापूस बाजारात विक्रीसाठी आणावा असा सल्ला सी सी आय यांनी दिला आहे. या वर्षीच्या कापूस उत्पादनाचा विचार केला तर राज्यात चार कोटी क्विंटल उत्पादनाची अपेक्षा आहे परंतु त्यापैकी फक्त अडीच कोटी क्विंटल कापूस बाजारात विक्रीसाठी आला आहे. अजूनही दीड कोटी क्विंटल कापसाची विक्री होणे बाकी आहे. अजूनही 45 टक्के कापूस हा शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे.
Share your comments