1. बातम्या

आता शेतकऱ्यांना मिळणार थेट तीन लाखांचे बिनव्याजी पीक कर्ज

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
पीक कर्ज  मिळणार बिना  व्याजाचे

पीक कर्ज मिळणार बिना व्याजाचे

राज्यातील शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख  व्याज सवलत योजनेअंतर्गत १ लाख ते ३ लाखांचे बिनव्याजी  पीक कर्ज उपलब्ध होणार आहे, राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना  शुन्य टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करण्याचा दृष्टीने शेतकऱ्यांनाही या योजनेचा फायदा होणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी निरनिराळ्या योजना राबवत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मोदी सरकार कसोशीने प्रयत्नशील आहे. त्यानंतर आता ठाकरे सरकारनेही शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न या योजनेतून केला आहे.

शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा झाला, तरच शेतीसंदर्भात नियोजन करणे सोयीचे होणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी आणि पेरणी हंगाम लक्षात घेता वेळेवर कर्ज उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी लागणार असल्याच्या सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या आहेत.

 

राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी बैठक झाली. त्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत एक लाखापर्यंतचे कर्ज बिनव्याजी तर तीन लाखांपर्यंतचे कर्ज दोन टक्के व्याजाने दिले जाते. मात्र, यंदाच्या खरीप हंगामासाठी तीन लाखांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी देण्यात येणार असल्याचे ठाकरे सरकारने सांगितले.

कर्जमाफी योजनेचा फायदा न मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीने लाभ देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना सहकार विभागास देण्यात आल्यात. त्यासाठी तालुका-जिल्हा समितीने तातडीने कार्यवाही करावी अशा सूचनाही या वेळी सहकारमंत्र्यांनी दिल्या आहेत. शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्जवाटपाची प्रक्रिया 31 मार्चपर्यंत पूर्ण करावी. 

प्रत्येक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी जिल्ह्यातील प्रत्येक कर्जदार शेतकऱ्याला केसीसी रूपे डेबिट कार्ड वितरीत करून त्यांना एटीएमद्वारे रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters