1. बातम्या

आता शेतकरी लवकर साधू शकणार संवाद, Nokia चा सर्वात स्वस्त 4G मोबाईल लॉन्च

नोकियाने ( Nokia)सर्वसामांन्याना परवडेल असा स्वस्त आणि मस्त मोबाईल (Nokia 110 4G) लॉन्च केला आहे. Jio Phone Next ला टक्कर देणारा हा मोबाईल असेल, असेही म्हटले जात आहे. कंपनीने हा मोबाईल आता विक्रीसाठी उपलब्ध करुन दिला आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
Nokia चा सर्वात स्वस्त 4G मोबाईल लॉन्च

Nokia चा सर्वात स्वस्त 4G मोबाईल लॉन्च

नोकियाने ( Nokia)सर्वसामांन्याना परवडेल असा स्वस्त आणि मस्त मोबाईल (Nokia 110 4G) लॉन्च केला आहे.  Jio Phone Next ला टक्कर देणारा हा मोबाईल असेल, असेही म्हटले जात आहे. कंपनीने हा मोबाईल आता विक्रीसाठी उपलब्ध करुन दिला आहे.

शेतकरी आता स्वस्तात संवाद साधू शकणार आहेत यूझर्ससाठी या मोबाईलमध्ये HD Voice Call चा ऑप्शन देण्यात आलेला आहे. सोबतच यामध्ये 4G कनेक्टीव्हीटी आहे. मोबाईलच्या बाजूच्या भागात मोठ्या आकारचे बटणही देण्यात आले आहेत. या मोबाईलचे Specifications काय आहेत, हे जाणून घेऊयात.

Nokia 110 4G features

Nokia 110 4G या मोबाईलमध्ये बॅक कॅमेरा, टॉर्च, इंटरनेट आणि वायरलेस FM सारखे भन्नाट फीचर्स आहेत. तसेच मोबाईलमध्ये MP3 प्लेअर आणि 3  in 1 स्पीकर आणि गेम्सही आहेत. या मोबाईलचा बॅटरी लाईफही दमदार आहे. 

Nokia 110 4G किंमत किती?

हा  Nokia 110 4G मोबाईल ई-कॉमर्स वेबसाईटवरुन खरेदी करता येणार आहे. तसेच Nokia.com/Phones या अधिकृत वेबसाईटवरुनही मोबाईल बूक करता येईल. या मोबाईलची किंमत केवळ 2 हजार 799 रुपये इतकी आहे. हा मोबाईल Yellow, Black आणि Aqua या तीन रंगामध्ये उपलब्ध आहे.

 

Nokia 110 4G Specifications

या मोबाईलचा 1.8 इंचचा QQVGA डिस्पले आहे. मोबाईलमध्ये ड्युअल सीम कार्ड (Nano Sim Slot) आणि Micro USB पोर्टही आहे. मोबाईलची बॅटरी ही 1020mAh इतकी आहे. स्टॅंड बायवर हा मोबाईलची बॅटरी 12 दिवस पुरेल, असा दावा कंपनीकडून करण्यात आलाय. मोबाईलमध्ये 48 MB इंटरनल स्टोरेज आहे. हा स्टोरेज मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 32 जीबीपर्यंत वाढवता येईल. मोबाईलचा रॅम हा 128MB RAM इतका आहे. मोबाईलमध्ये  Unisoc T107 CPU और Series 30+ ही ऑपरेटींग सिस्टम आहे.

English Summary: Now farmers will be able to communicate faster, Nokia's cheapest 4G mobile launch Published on: 22 August 2021, 09:25 IST

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters