शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी अनेकदा मागणी करण्यात आली आहे. असे असताना आता शेतील दिवसा वीज उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठीची ही 'फ्लॅगशीप' योजना सर्व जिल्ह्यांमध्ये अतिशय प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांनी दिले आहेत.
यामुळे यामधून शेतकऱ्यांचे समाधान होणार का हे लवकरच समजेल. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची एक दिवसीय परिषद सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे पार पडली. यामध्ये शेतकऱ्यांबाबत अनेक विषयांवर चर्चा झाली.
खाद्य तेलाचे दर वाढणार की कमी होणार, जाणून घ्या..
यावेळी फडणवीस यांच्या हस्ते योजनेचे लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. कारण ही स्वस्त आणि हरित ऊर्जा आहे, असे फडणवीस यावेळी म्हणाले.
यामध्ये जास्तीत जास्त फीडर हे सौर ऊर्जेवर आणण्यावर भर देण्यात येणार आहे. सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणारा जिल्हा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्नशील रहावे, अशा सुचना दिल्या आहेत. तसेच या प्रकल्पांमध्ये जमिनीची उपलब्धता कालबद्ध होणे अत्यंत गरजेचे आहे.
बंपर कमाई! याठिकाणी शेतकरी एका खास पद्धतीने भेंडी पिकवतात, दर 100 रुपये किलो, जाणून घ्या..
यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी महावितरण सब स्टेशनच्या पाच ते दहा किलोमीटरमधील शासकीय व निमशासकीय जमिनींची माहिती गोळा करावी. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
मोदींचा 2 हजाराचा 14 वा हप्ता मे महिन्यात होणार जमा, शेतकऱ्यांनो केवायसी करा...
दुःखद! वीज कोसळून अख्ख शेतकरी कुटुंब ठार
खाद्य तेलाचे दर वाढणार की कमी होणार, जाणून घ्या..
Share your comments