1. बातम्या

Money Transfer: आता आधार कार्ड च्या साह्याने पाठविता येतील पैसे, जाणून घेऊ प्रक्रिया

आपल्याला माहिती आहे की आधार कार्ड सगळ्यात महत्वाचे आवश्यक कागदपत्रं पैकीएक आहे. तुम्हाला बँकेत खाते उघडायचे असेल,कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा साध्या सिम कार्ड जरी घ्यायचा असेल तर आधार कार्ड लागते. त्यामुळे आता प्रत्येकाकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
money transfer

money transfer

 आपल्याला माहिती आहे की आधार कार्ड सगळ्यात महत्वाचे आवश्यक कागदपत्रं पैकीएक आहे. तुम्हाला बँकेत खाते उघडायचे असेल,कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा साध्या सिम कार्ड जरी घ्यायचा असेल तर आधार कार्ड लागते. त्यामुळे आता प्रत्येकाकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

आपल्याला माहिती आहे की, नोटबंदी नंतर जास्तीत जास्त भर हा डिजिटल व्यवहारांवर देण्यात आला.या बाबतीत केंद्र शासनाने देखील प्रोत्साहन दिले.कोरोना  काळापासून तर जास्ती जास्त डिजिटल व्यवहारांचा वापर वाढला.आपल्याला माहिती आहेच की सध्या पैसे हस्तांतर करण्यासाठी गुगल पे,फोन पे,पेटीएम यासारख्या डिजिटल सुविधांचा वापर केला जातो. त्याचाच भाग म्हणून सरकारने एक सुविधा आणली आहे ती म्हणजे,ज्या नागरिकांकडे स्मार्टफोन नाही,अशा व्यक्तींना एखाद्याला पैसे हस्तांतर करण्यासाठी बऱ्याच समस्या होतात.

त्या नागरिकांना सोयीचे व्हावे म्हणून युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी म्हणजे यूआयडीएआय नेभीम ॲप वापरणाऱ्या स्मार्टफोन किंवा यूपीआय शिवाय प्राप्तकर्त्यांनाआधार क्रमांक वापरून पैसे पाठवू शकतात. भीम ॲप हे यूपीआय आधारित पेमेंट इंटरफेस आहे.यामध्ये तुमच्या मोबाईल नंबर किंवा नावयाचा वापर करून रियल टाइम फंड ट्रान्सफर ला अनुमती देतो.  युआयडीएआय नुसार भीम ॲप मध्येप्राप्त करण्याचा प्रस्ताव आधार क्रमांक टाकल्यास पैसे पाठवण्याच्या पर्याय दिसतो.

आधार क्रमांक वापरून तुम्ही या पद्धतीने पाठवू शकता पैसे

 या पद्धतीने पैसे पाठवण्यासाठी भीम ॲप वापरकर्त्यांनी प्राप्त करण्याचा बारा अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करावा.त्यानंतर व्हेरिफिकेशन बटन दाबावे. त्यानंतर या प्रणाली मार्फत आधार लिंकिंग ची पडताळणी केली जाते आणि प्राप्त कर्त्याचा  पत्ता भरेल आणि वापरकर्तेयु आय डी ए आय मी दिलेल्या माहितीनुसार पैसे पाठवू शकतील.

यामध्ये तुम्हाला यु आय डी ए आय नुसार आधारित पेमेंट करताना ज्या बँकेतून पेमेंट करायचे आहे त्या बँकेच्या नाव निवडण्याचा पर्याय दिला जाईल.अशाप्रकारे वापरकर्त्यांना प्रत्येक वेळी पेमेंट करताना बँक निवडण्याचा पर्याय दिसेल.तसेच जेव्हा तुम्ही आधार पेद्वारे पेमेंट कराल तेव्हा तुमचे खाते ऑनलाईन डेबिट केलेजाईल. तसेच महत्त्वाचे म्हणजे एखाद्या वापरकर्त्याचे जर एकापेक्षा जास्त बँकांमध्ये खाती असतील आणि सर्व खाती आधार क्रमांकाशी लिंकअसतील,तर सर्व खाती डिजिटल पेमेंट करण्यासाठी वापरली जाऊ शकतात.

English Summary: now can money transfer to use aadhar card number by bhim app Published on: 21 November 2021, 07:54 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters