1. बातम्या

आत्ता आले MAadhaar app; घरबसल्या करा आधार कार्ड संबंधी काम

KJ Maharashtra
KJ Maharashtra

आधार कार्ड हे सगळ्यात महत्त्वाच्या कागदपत्रांची एक कागदपत्र आहे. सगळे शासकीय कामांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. परंतु बऱ्याच ठिकाणी आवश्यक असणाऱ्या आधार कार्ड प्रत्येक वेळी सोबत नेणे शक्य असते असे नाही. त्यासाठी यूआयडीएआयने एम आधार ऍप सादर केला आहे.

 त्यामुळे तुम्हाला आता आधार कार्डचे हार्ड कॉपी सोबत ठेवण्याची गरज नाही. यु आय डी  आय ट्विट करत म्हटले की, तुम्ही तुमच्या स्मार्ट फोनवर 35 हून अधिक आधार संबंधीच्या सेवा मिळू शकतात जसे की डाऊनलोड ई  आधार, स्टेटस अपडेट, तुमच्या नजीकच्या आधार केंद्राचा पत्ता इत्यादी गोष्टी तुम्ही सहज पाहू शकता.

  ॲपद्वारे मिळणाऱ्या सुविधा

 

या ॲपद्वारे तुम्हाला खालीलप्रमाणे सेवा मिळू शकतात. प्रोफाइल अपडेट, क्यू आर कोड शेअरिंग, आधार लॉकिंग, बायोमेट्रिक लॉकिंग आणि अन लॉकिंग, ऍड्रेस व्हॅलिडेशन रिक्वेस्ट, क्यू आर कोड स्कॅनिंग, व्हेरिफाय आधार, रेट्रीव  यूआयडी,  पत्ता बदलणे इथे बर्‍याच प्रकारच्या सुविधा या ॲप द्वारे मिळणार आहेत. महत्वाचे म्हणजे  इ आधार ॲपच्या माध्यमातून वापरकर्त्याला स्वतःचा आधार नंबर हवा तेव्हा लोक किंवा अनलॉक करता येऊ शकते. आधार कार्डशी आपली पर्सनल माहिती जोडली केली असल्याने त्याची सुरक्षितता महत्त्वाची असते. ॲप बारा भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters