कोरोनाचा विचार केला तर देशात कोरोनाचे दुसरी लाट वेगाने पसरत असून केंद्र सरकारने निर्णय घेतला की 45 वर्षावरील सर्व लोकांना कोरोना लस घेण्याची परवानगी दिली आहे.
देशात कोरोना लसीकरणाचादुसरा टप्पा हा एक मार्चपासून सुरू झाला होता, तर 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली होती. कोरोना लस घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करावी लागते. या रजिस्ट्रेशन ची पद्धत कशी आहे हे या लेखात जाणून घेऊ या.
- सर्वप्रथम आरोग्य सेतू ॲप किंवा को- विन ॲप वेबसाईटवरून लॉगिन करा.
- आरोग्य सेतू ॲप वर मोबाईल नंबर टाकून ओटीपी वर क्लिक करावे.
- आरोग्य सेतू ॲप मधील को विन टॅब वर जाऊन लसीकरण टॅबवर क्लिक करा.
- त्यानंतर एक पेज तुमच्यासमोर उघडेल. त्या मध्ये तुमचा फोटो आयडी, क्रमांक सह तुमचे पुर्ण नाव नोंदवा.
- फोटो आयडी प्रूफ म्हणून ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड किंवा आधार कार्ड अपलोड करा किंवा नोंदवा.
- त्यानंतर रजिस्टर बटणावर क्लिक करा.
- नोंदणी केल्यानंतर फोन वर रिप्लाय येईल.
- नोंदणीकृत व्यक्ती एका मोबाईल वर चार लोकांची नोंदणी करु शकते.
- यानंतर कॅलेंडर आयकॉन वर क्लिक करून तारीख निवडा. लसीकरणासाठी नोंदणी करा.
- त्यानंतर तुमच्या समोर लसीकरण केंद्राची यादी दिसते. त्यामधून तुम्हाला सोयीस्कर असे केंद्र निवडा..
- त्यानंतर एक अपॉइंटमेंट सक्सेस फुल पेज ओपन होते, यामध्ये तुम्ही जी माहिती भरली आहे ती सगळी दिसते. ती तुम्ही डाऊनलोड करू शकता.
- तसेच लाभारती लसीच्या दुसरा डोस साठी ॲप द्वारे तारीख बदलू शकतो.
- यासाठी मोबाईल नंबर द्वारे लॉग इन करावे.
- नंतर ओटीपी टाकून आणि एडिट आयकॉनवर क्लिक करा.
- आमच्या तुमच्या सोयीनुसार तारीख निवडावी.
Share your comments