सध्या या दिवसात शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादित करत असतो. शिवाय या दिवसांमध्ये बाजारात भाजीपाल्याची मागणी अधिक असते. यात भाजीपाल्याची शेती करणाऱ्यासाठी एक आनंदाची बातमी हाती आली आहे.
देशांतर्गत ग्राहकांना रेसिड्यू फ्री भाजीपाला उपलब्ध व्हावा, यासाठी व्हेजी नेटचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. सुरुवातीला तर आपण पाहिले तर व्हेज नेटवर फक्त भेंडी, मिरची या दोनच पिकांची नोंदणी करता येत होती. परंतु आताच्या निर्णयानुसार अपेडाकडून ४३ भाजीपाला वर्गीय पिकांची व्हेजी नेटवर नोंदणी शक्य झाली आहे.
याच्या माध्यमातून रेसिड्यू फ्री भाजीपाला उत्पादकांचा डेटाबेस उपलब्ध होण्यास मदत होईल. जर जगाचा विचार केला तर भाजीपाला उत्पादनात पहिल्या क्रमांकावर चीन तर दुसऱ्या क्रमांकावर भारताचा क्रमांक लागतो. त्यामुळे निर्यातीच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत. असे असले तरी आपल्याकडे स्थानिक मागणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे निर्यातीसाठी विशेष प्रयत्न होत नाहीत.
परंतु मागील काही वर्षांपासून शेती क्षेत्रामध्ये तरुणांचा सहभाग वाढल्याने त्यांच्याकडून रेसिड्यू फ्री किंवा निर्यातीसाठी देशनिहाय निश्चित कीडनाशक मर्यादित शेतीमालास मत आहे. केंद्र सरकारने देखील सुरक्षित अन्न पिकवा अभियानाच्या माध्यमातून या प्रयत्नांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजीपाला पिकांच्या निर्यातीला चालना मिळावी मिळावी म्हणून व्हेज नेटवर भाजीपाला पिकांची संख्या वाढवण्यात आली आहे.
Share your comments