उदगीर तालुक्यातील चोंडी येथील शेतकरी शिवाप्पा रामन्ना चिट्टे यांनी 22 मे 2013 रोजी उदगीर येथील मोंढा रोड वरील भारतीय स्टेट बँकच्या शाखेकडून, 'एटीएल कॉम्प मायनर एरिगेशन' या कामासाठी 2 लाख रुपयांचे मुदत कर्ज घेतले होते. याची त्यांनी परतफेड देखील केली. असे असताना त्यांना 60 हजार 209 रुपयांचा भरणा करा अशी नोटीस बजावली गेली.
त्यानंतर बँकेने अजून नोटीस बजावल्या, असे असताना महाराष्ट्र सरकारने थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ केलेले असतानाही, शेतकऱ्याला नोटीस पाठवून थकबाकी भरुन घेण्यास सांगणाऱ्या या एसबीआय बँकेला ग्राहक मंचने चांगलाच दणका दिला आहे. यामुळे याची चर्चा सुरु आहे. बँकेला पाच हजारांचा दंड ठोकून सदर शेतकऱ्यास बेबाकी प्रमाणपत्र आणि 7/12 वरिल बोजा कमी करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्य सरकाने थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्ज छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना या योजने अंतर्गत माफ केले होते. त्यामुळे सदर शेतकऱ्यांनी याची कल्पना बँकेला दिली आणि बेबाकी प्रमाणपत्र आणि 7/12 वरील बोजा कमी करण्याची विनंती बँकेकडे केली होती. असे असताना देखील बँकेने याकडे लक्ष दिले नाही.
उत्तर प्रदेशमध्ये मोफत मिळणार देशी गाई, संभाळण्यासाठी 900 रुपयेही देणार..
दरम्यान, शिवाप्पा चिट्टे यांनी जिल्हा ग्राहक मंचात तक्रार दाखल केली. याची गंभीर दखल घेत ग्राहक मंचने भारतीय स्टेट बँक, शाखा मोंढा रोड, उदगीर येथील शाखा प्रबंधकांना हजर राहण्यास सांगीतले. मात्र बँकेच्या वतीने कोणीच हजर राहिले नाही. यामुळे याबाबत चौकशी केली असता शेतकऱ्याची बाजू साफ दिसून आली.
त्यामुळे ग्राहक मंचने याबाबत निकाल दिला. ग्राहक मंचने निकाल देताना म्हटले आहे की, एसबीआय बँकेने शेतकऱ्यास थकबाबीदार म्हणून नोटीस दिलेली आहे. ज्या कालावधीतील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे त्याच कालावधीत सदर शेतकरी बसतात त्यामुळे त्यांचे कर्जही शासनाने माफ केलेले आहे. असे असतानाही बँकेने त्यांना नोटीस पाठविली.
'वाघ आहे की शेळ्या दाखवू देऊ, गेल्यावर्षीचा हिशेब घेतल्याशिवाय राहणार नाही'
तसेच बँकेने या शेतकऱ्यास 3 हजार रुपये व न्यायालयीन खर्च 2 हजार रुपये असे पाच हजार रुपये 45 दिवसांच्या आत शेतकऱ्यास द्यावेत, असे आदेश दिले. यामुळे या शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक शेतकऱ्यांचे अशा प्रकारे ग्राहक मंचाने मिळवून दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या;
चीनमध्ये लोकांचा लॉकडाऊनला विरोध, सरकारविरोधातील आंदोलनात 10 लोकांचा मृत्यू
कडकनाथ घोटाळ्याबाबत मोठी बातमी! कंपनीच्या संचालकाला अटक, शेतकऱ्यांचे बुडालेले पैसे मिळणार का?
चालू बिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांची वीज कापावी, महावितरणच्या संचालकाचे आदेश
Share your comments