सध्या कापूस दराचा विचार केला तर खुल्या बाजारात कापसाला चांगला भाव मिळत आहे. तसेच भारतीय कापूस महामंडळ अर्थात सीसीआय थेट बाजारात कापूस खरेदीसाठी उतरल्याने राज्य कापूस पणन महासंघाच्या करण्याची शक्यता कमी असल्याचे सध्या चित्र आहे.
कापसाच्या किमान आधारभूत किंमत अर्थात एम एस पी याचा विचार केला तर धाग्यानुसार पाच हजार आठशे ते सहा हजार तीनशे पर्यंत आहे.जर खुल्या बाजारामध्ये खाजगी व्यापार्यांनी भाव खाली पाडले तर पणन महासंघाच्या कापूस करण्याची खरी आवश्यकता राहील. परंतु सध्या खुल्या बाजारात कापसाला आठ हजारांच्या पुढे भाव मिळत असल्याने सध्या पणन महासंघाच्या खरेदी ची गरज नसल्याने पणनची कापूस खरेदी सुरू करण्यात आलेले नाही, अशी माहिती पणन महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख यांनी दिली.
कापसाचे भाव आहे हमीभावा पेक्षा कमी किंवा हमीभावा इतके कोसळल्यास त्यादृष्टीने पणन महासंघाने खरेदीची तयारी व नियोजन केले आहे, असे अनंतराव देशमुख यांनी सांगितले.या खरीप हंगामात राज्यात 39.37 लाख हेक्टरवर कापूस लागवड करण्यात आली.मागील हंगामात हेच प्रमाण 42.08 लाख हेक्टर होते.सध्या पंजाब,राजस्थान इत्यादी राज्यांमध्ये कापसाला7200 ते आठ हजार तीनशे रुपये क्विंटलभाव मिळत आहे. तर महाराष्ट्र,तेलंगणा आणि मध्यप्रदेश मध्ये सात हजार पाचशे ते आठ हजार पाचशे रुपये क्विंटल भाव मिळत आहे.
शेतकऱ्यांना खुल्या बाजारात जास्त भाव मिळत असल्यानेपणन महासंघाकडे कोणीहीकापूस विक्रीसाठी येणार नाही.त्यामुळे पणन महासंघाची अजून खरेदी सुरू झालेली नाही.परंतु आवश्यकता वाटल्यास ती सुरू करण्याची तयारी आणि नियोजन झाले असल्याचे नंतर देशमुख यांनी सांगितले.
तसेच दुसरी समस्या ही पणन महासंघात मनुष्यबळाची आहे.सन 2005 मध्ये पणन महासंघत स्वेच्छानिवृत्ती योजना आली. त्यावेळी 4822 कर्मचाऱ्यांपैकी 3990 कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने 832 कर्मचारी उरले.त्यातही कालांतराने संख्या कमी होऊन आता 117 कर्मचारिवरआली आहे.त्यामध्ये 66 ग्रेडरआहे.
Share your comments